पूर्वी सकाळी तीन वाजता नळाला पाणी येत असे त्यात बदल करून सकाळी उशिरा पाणी सोडण्याचा निर्णय महापालिका पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे.मोलमजुरी करणारे नागरिक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कामावर जाण्यासाठी अडचणी येत आहेत.
त्यामुळे पूर्वी प्रमाणे सकाळी ३ वाजता नळाला पाणी सोडण्यात यावे. पूर्वी प्रमाणे उच्च दाबाने पाणी पुरवठा करावा. मागील अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेली व गंजलेली पाईपलाईन बदलून नवीन पाईपलाईन टाकण्यात यावी. आदी मागण्या शाखा सचिव कॉ.मंगेश वट्टेवाड यांनी निवेदनाद्वारे आयुक्त डॉ.महेश डोईफोडे यांच्याकडे केल्या आहेत.
निवेदनातील मागण्या लवकरात लवकर सोडवून सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली आहे.मागासवर्गीय व कामगार वस्तीकडे दुर्लक्ष करणाऱ्या पाणीपुरवठा विभागाला वेळीच जाग आली नाहीतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या गोलचाळ शाखे मार्फत महापालिके समोर किंवा आयुक्तांच्या कक्षा बाहेर तीव्र आंदोलन करण्याचा लेखी इशारा कॉ. मंगेश वट्टेवाड यांनी लेखी स्वरूपात आयुक्तांना दिला आहे

COMMENTS