माहूर (प्रतिनिधी ) माहूर तालुक्यातील अनेक गावांत तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून, या संकटावर मात करण्यासाठी संबंधित विभाग मात्र कमालीचा ...
माहूर (प्रतिनिधी ) माहूर तालुक्यातील अनेक गावांत तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून, या संकटावर मात करण्यासाठी संबंधित विभाग मात्र कमालीचा उदासीन दिसत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे.
ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता प्रमोद बनसोडे यांनी 2 मार्च रोजी विविध गावांतील नळ योजना विशेष दुरुस्ती व तात्पुरत्या पूरक नळ योजनांसाठी कोट्यवधी रुपयांचे अंदाजपत्रक जिल्हा परिषद नांदेड येथील कार्यकारी अभियंता कार्यालयाकडे पाठविले होते. मात्र या प्रस्तावाला तब्बल दोन महिन्यांनी, म्हणजेच 30 एप्रिल रोजी मान्यता मिळाली. या विलंबामुळे आधीच गंभीर झालेली पाणी टंचाई अधिकच तीव्र झाली आहे.
वानोळा, कुपटी, साकूर, वाई बाजार, चोरड, नाईकवाडी, भोरड खेडी, अजनी, सावरखेड, मलकागुडा तांडा, जेमला नाईक तांडा आदी गावांतील नळ योजनांच्या दुरुस्तीसाठी व तात्पुरत्या पूरक नळ योजनेसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र संबंधित विभागाचे उदासीन धोरणामुळे प्रत्यक्ष कामांना गती मिळणार यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही.दरम्यान, मंजुरी मिळाल्यानंतर उपअभियंता बनसोडे यांनी सर्व 22 ग्रामपंचायतींकडून करारनामा सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, आतापर्यंत केवळ दोनच ग्रामपंचायतींनी करारनामा सादर केल्याची माहिती त्यांनी दिली.

COMMENTS