लोहा /प्रतिनिधी माळाकोळी सर्कलसह लोहा ता लोहा तालुक्यातील माळाकोळी सर्कलमधील अनेक गावांमध्ये सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत असून नागरिकांचे ...
लोहा /प्रतिनिधी
माळाकोळी सर्कलसह लोहा ता लोहा तालुक्यातील माळाकोळी सर्कलमधील अनेक गावांमध्ये सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकप्रिय नेते भीमाशंकर (मामा) कापसे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले.सदर निवेदनात संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ उपाय योजना करून गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून द्यावी,
तसेच आवश्यक त्या ठिकाणी त्वरित टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली. पाण्याच्या अभावामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
यावेळी भीमाशंकर (मामा) कापसे यांनी प्रशासनावर टीका करत, "जोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. प्रशासनाने कुंभकर्णी झोप सोडून तात्काळ उपाययोजना करा व्यात आणि जनतेला न्याय द्यावा," असा इशारा दिला. तसेच, मागण्यां
असा इशारा दिला तर मागण्या
कडे दुर्लक्ष झाल्यास तहसील कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने 'घंटानाद आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. या वेळी बाबासाहेब बाबर,
काशीराम जामकर, भारत मस्के, राजरत्न गायकवाड, रमेश ठाकूर (सर), राम पाटील कापसे, दीपक रायफळे, प्रसाद भैया पोले, विजय केंद्रे, प्रमोद नागरगोजे, रितेश एडके आदी कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पाणीटंचाईचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी नागरिकांकडूनही जोर धरत आहे.

COMMENTS