नांदेड /प्रतिनिधी नांदेड जिल्ह्यात ज्वारीचे उत्पादन समाधानकारक झाले असतानाही योग्य हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान ह...
नांदेड /प्रतिनिधी नांदेड जिल्ह्यात ज्वारीचे उत्पादन समाधानकारक झाले असतानाही योग्य हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. जिल्ह्यात शासन स्तरावरून ज्वारी खरेदी केंद्र तात्काळ सुरू करून शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळावे अशी मागणी खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
काला रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,
नांदेड जिल्ह्यात ज्वारी हे एक प्रमुख पीक असून यावर्षी ज्वारीचे उत्पादन समाधानकारक झाले आहे. तथापि, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनास योग्य हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, इतका मोठा जिल्हा असतानाही शासन स्तरावरून अद्याप एकही ज्वारी खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नाही, ही बाब अत्यंत गंभीर आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याचे खासदार चव्हाण यांनी स्पष्ट केले..
शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी या बाबीकडे वैयक्तिक लक्ष देऊन शासन स्तरावरून नांदेड जिल्ह्यात ज्वारी खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी खासदार चव्हाण यांनी केली.

COMMENTS