लोहा /प्रतिनिधी प्रयत्न करता वाळु रगडाही निघे तेल या म्हणीप्रमाणे लोहा तालुक्यातील मौजे पेनुर येथील केवळ १ एकर शेती असणाऱ्या व सायकलचे पंचर ...
लोहा /प्रतिनिधी
प्रयत्न करता वाळु रगडाही निघे तेल या म्हणीप्रमाणे लोहा तालुक्यातील मौजे पेनुर येथील केवळ १ एकर शेती असणाऱ्या व सायकलचे पंचर काढुन आपली उपजीविका भागविणाऱ्या विठोबा गवते यांच्या दोन्ही मुली नागपूर पोलीस दलात पोलीस म्हणून निवड झाली आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे शिक्षण हे वाघीनीचे दुध आहे जो हे प्राषण करील तो गुरगुरल्या राहणार नाही व शिक्षण हे आपल्या गरिबीवर मात करण्याचे साधन आहे.
लोहा तालुक्यातील मौजे पेनुर येथील केवळ १ एकर शेती असलेले अल्पभूधारक शेतकरी विठोबा गवते यांना दोन मुली व एक मुलगा आहे. घरची परिस्थिती बेताची असताना ही त्यांने आपल्या दोन मुली व एका मुलांना चांगले शिकविले. काबाडकष्ट करून आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी त्याने नेहमी पाठीबा दिला.
वडील हे काबाडकष्ट करून आपल्याला शिक्षण शिकवीत आहेत. त्यांच्या मेहनतीचे चीज झाले पाहिजे हा उध्दांत हेतु म्हणी ठेवून त्यांच्या दोन्ही मुलींने जिद्द, परिश्रम जोरावर व अभ्यासात सातत्य ठेवून त्यांची मोठी मुलगी कु. ज्योती विठोबा गवते हिने पोलिस भरतीची तयारी करुन २०२२ मध्ये नागपूर पोलीस दलात भरती झाली व मोठ्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत छोटी बहीण कु.स्वाती विठोबा गवते हीची सुध्दा २०२६ मध्ये नागपूर पोलीस दलात पोलीस काॉन्स्टेबल म्हणून निवड झाली.
*पेनुर गावकऱ्यांच्या वतीने सत्कार*
बेटी पढाव बेटी बचाव या घोषवाक्ये प्रमाणे पेनुर येथील अल्पभूधारक शेतकरी विठोबा गवते यांनी मुलगा मुलगी आसा भेदभाव न करता आपल्या दोन्ही मुलींना चांगले शिक्षण शिकवून त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहुन दोन्ही मुलींना पोलीस दलात भरती होण्यास सिंहांचा वाटा उचलल्यामुळे पेनुर येथील सामाजिक कार्यकर्ते मारोती एजगे व पत्रकार विरभद्र एजगे, गिरीष एजगे या बंधू च्या पुढाकारातून गावचे माजी सरपंच बाबाराव पाटील गवते,माजी सरपंच गंगाधर पाटील गवते, युवानेते बाळू पाटील गवते, राम पाटील गवते, चंद्रकांत पाटील गवते, विजय सूर्यवंशी व सर्व गावकऱ्यांनी महिला पोलिस कॉन्स्टेबल कु.ज्योती विठोबा गवते व पोलीस काॅन्सटेबल कु. स्वाती विठोबा गवते यांचा सत्कार केला.

COMMENTS