नांदेड: पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होऊ नये आणि अपघात टाळण्यासाठी महावितरणने हाती घेतलेली पूर्व पावसाळी देखभाल व दुरुस्तीची कामे मे २०२६ अखेर...
नांदेड: पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होऊ नये आणि अपघात टाळण्यासाठी महावितरणने हाती घेतलेली पूर्व पावसाळी देखभाल व दुरुस्तीची कामे मे २०२६ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे कडक निर्देश सहव्यवस्थापकीय संचालक श्री. आदित्य जिवने यांनी दिले आहेतनांदेड येथील नियोजन भवनात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डिले, मुख्य अभियंता श्री. राजाराम माने आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे:
बॅनर्स व फ्लेक्सवर कारवाई: वीज प्रवाहाच्या तारा आणि खांबावर लावले जाणारे अनधिकृत फ्लेक्स व बॅनर्समुळे अपघाताचा धोका असतो. असे फलक लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
तांत्रिक कामे: झाडांच्या फांद्यांची छाटनी, वाकलेले खांब सरळ करणे, सदोष केबल व इन्सुलेटर बदलणे आणि रोहित्रांची (Transformers) क्षमता वाढवण्यावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
नवीन उपकेंद्र: नांदेडमधील तरोडा नाका, चैतन्यनगर आणि सांगवी भागातील विजेची समस्या सोडवण्यासाठी पीरबुऱ्हाण भागात नवीन उपकेंद्रासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
सौर ऊर्जा प्रकल्प: मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात एकूण ६१ प्रकल्प पूर्ण झाले असून, त्यातून २६२ मेगावॅट वीज निर्मिती होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणे सुलभ होईल.
वीज बिल वसुली: या पुढील काळात नांदेड, हिंगोली आणि परभणी मंडळांना १०० टक्के वीज बिल वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
ग्राहकांच्या तक्रारींची तात्काळ दखल घेण्यासह, वीज पुरवठा बंद असल्यास त्याची पूर्वसूचना ग्राहकांना देण्याचे निर्देशही यावेळी श्री. आदित्य जिवने यांनी स्थानिक प्रशासनाला दिले.

.jpeg)
COMMENTS