नांदेड:(दि.१९ मे २०२६) यशवंत महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना कक्षासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि प्रेरणादायी क्षण दि. १८ म...
नांदेड:(दि.१९ मे २०२६)
यशवंत महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना कक्षासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि प्रेरणादायी क्षण दि. १८ मे रोजी अनुभवायला मिळाला. छत्रपती संभाजीनगर येथील ग्रुप कमांडर ब्रिगेडियर अनुप बरबरे तसेच ५२ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, नांदेडचे कमांडिंग ऑफिसर कर्नल दिलीप रेड्डी यांनी महाविद्यालयातील एनसीसी विभागास सदिच्छा भेट दिली याप्रसंगी माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांना सैनिकी क्षेत्रातील बदलते आव्हान, राष्ट्रीय सेवेचे महत्त्व आणि नेतृत्व गुणाविषयी मार्गदर्शन करणे, हा या भेटी मागील हेतू होता.
यावेळी ब्रिगेडियर अनुप बरबरे यांना महाविद्यालयाच्या वतीने गार्ड ऑफ ऑनर देण्यात आले. प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांनी दोन्ही मान्यवरांचे स्वागत केले.
तद्नंतर एनसीसी विभागाची सखोल प्रशासकीय तपासणी करत विभागाच्या कार्यपद्धतीचे व विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध कामगिरीचे विशेष कौतुक केले. तसेच भविष्यातही विभागाने याच जोमाने राष्ट्रीय सेवेची परंपरा पुढे चालू ठेवावी, अशा मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांना संबोधित करताना ब्रिगेडियर अनुप बरबरे म्हणाले की, राष्ट्रीय छात्र सेना हे केवळ संघटना नसून देशभक्ती, शिस्त, धैर्य आणि नेतृत्व घडविणारी एक जीवनशाळा आहे. एनसीसी मधून तयार होणारे विद्यार्थी भारताच्या एकात्मतेचे आणि संरक्षणाचे खरे शिलेदार ठरतात. प्रत्येक कॅडेटने राष्ट्रीय सेवा हीच सर्वोत्तम सेवा म्हणून जीवनात प्रामाणिकपणे कार्य केले पाहिजे.
कार्यक्रमाचे आयोजन एनसीसी विभागप्रमुख लेफ्टनंट प्रा. श्रीकांत सोमठाणकर यांनी केले. संपूर्ण महाविद्यालय परिसर देशभक्ती, शिस्त आणि अभिमानाच्या भावनेने भारावून गेला होता.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एसयुओ रणवीर ठाकूर, जेयुओ बापूराव नवरखेले, जेयुओ रविकांत कांबळे, निशा तेलंगे तसेच इतर एनसीसी कॅडेट्सनी परिश्रम घेतले तसेच प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक गजानन पाटील यांनी सहकार्य केले.

COMMENTS