नांदेड: शहरातील माता गुजरीजी विसावा उद्यानाच्या दुरवस्थेबाबत बालाजी पवार व जागरूक नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत महापौर कविताताई मुळे व संत...
नांदेड: शहरातील माता गुजरीजी विसावा उद्यानाच्या दुरवस्थेबाबत बालाजी पवार व जागरूक नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत महापौर कविताताई मुळे व संतोष मुळे यांनी आज उद्यानाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.यावेळी उद्यानातील अस्वच्छता आणि सोयीसुविधांचा अभाव पाहून महापौरांनी तीव्र संताप व्यक्त केला व संबंधित विभागांना तात्काळ दुरुस्तीचे आदेश दिले.
यावेळी बालाजी पवार आणि माॅर्निंग ग्रुपच्या सहकाऱ्यांनी महापौरांना एक निवेदन सादर केले. त्यात खेळांच्या साधनांची दुरवस्था, ओपन जीमची नवीन साधने बसवावीत, बंद पडलेली रेल्वे, खाऊ गल्लीच्या शेजारी कच-याचा ढिग, झाडांना वेळेवर पाणी देणे, झाडं नाहीत किंवा वाळलेत येथे नवीन झाडे लावावीत, वेळेवर झाडांची छाटणी करणे, हिरवळीसाठी नवीन गवत लावणे, शोभेच्या फुलांची झाडे लावणे, पाने व फुले तोडू नये अशा पाट्या लावणे, कचरा कुंड्या वाढवाव्यात, उद्यानात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, शौचालयांची दुरवस्था झाली आहे ती दुरुस्त करावी, उद्यानात संध्याकाळी पोलिस पथकाची व्यवस्था करावी इत्यादी मागण्या केल्या आहेत. यावेळी पसरलेला कचरा व तुटलेली खेळणी आणि ओपन जिमच्या साहित्याची झालेली दुरवस्था दाखवत यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याची व्यथा बालाजी पवार व सहका-यांनी मांडली.
यावेळी महापौर कविताताई व संतोषराव मुळेसह उपस्थित नागरिकांनी संपूर्ण उद्यानाचा फेरफटका मारला. फेरफटका मारल्यानंतर महापौरांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळावरूनच स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधला. उद्यानातील कचरा ताबडतोब उचलायला सांगितले. तसेच उद्यानातील दुकानदारांना कचरा डस्टबीन मध्येच टाकावा अशा सुचना देण्याचे निर्देश दिले. यावेळी जेष्ठ राजेश्वर बिडवेई यांनी जेष्ठ नागरिकांना लवकर इन्फेक्शन होते तेंव्हा काळजी घेण्याची विनंती केली तेंव्हा महापौर यांनी दखल घेवून अशा कडक सूचना दिल्या. मुलांसाठी खेळांची नवीन साधने आणि व्यायामप्रेमींसाठी 'ओपन जिम'चे नवीन साहित्य तातडीने बसवण्यात यावे, असे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
या पाहणीच्या वेळी लवकरच माता गुजरीजी विसावा उद्यानाचा कायापालट होणार असल्याचे सांगितले. यावेळी माजी मंत्री डी.पी.सावंत, उद्यान अधीक्षक मीर्झा बेग, कदम, काठीकर सह महापालिका कर्मचारी उपस्थित होते. निवेदनावर सुभाष बल्लेवार, डॉ रूतुराज जाधव, सदानंद मेडेवार, गिरीश जाधव, प्रवीण खंदारे, चंद्रकांत घाटोळ, संदीप कटकमवार, भागवत गायकवाड, नंदकुमार काकडे, विनायक मोरे पाटील, वैभवी चिद्रावार, एकनाथ वट्टमवार, बालाजी कटकमवार, ज्ञानेश्वर पत्तेवार, अनील सावंत, दिलीप आग्रवाल, सुरेश काढे, राजेंद्र हुरणे यांच्यासह साठ जणांच्या सह्या असून निवेदन देताना मोठ्या प्रमाणात बालाजी पवार व माॅर्निंग ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. आत्ता प्रशासनाकडून किती वेगाने अंमलबजावणी होते याकडे लक्ष द्यावे लागेल. यावेळी
मॉर्निंग वॉक ग्रुपने महापौरांचे आभार मानले.

COMMENTS