नायगाव प्रतीनीधी:ग्रामीण मातीतून उगवलेल्या प्रतिभेने पुन्हा एकदा राज्याच्या पटलावर आपला ठसा उमटवला आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे पार पडलेल्या डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत नायगावच्या अन्वय धनराज चव्हाण याने उल्लेखनीय कामगिरी करत सिल्वर मेडल पटकावले. विज्ञानाच्या क्षेत्रात लहान वयातच गवसलेले हे यश नायगावसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
शांकुतल स्कूल फॉर एक्सलन्स (CBSC School), पासदगाव नांदेड, जि. नांदेड येथील इयत्ता सहावीचा विद्यार्थी असलेल्या अन्वयने “Mission Zero Waste” या अभिनव प्रकल्पातून 3R (Reduce, Reuse, Recycle) या संकल्पनेची प्रभावी मांडणी केली. वाढत्या कचऱ्याच्या समस्येवर उपाय शोधत त्याने प्लास्टिकचा पुनर्वापर, टाकाऊ वस्तूंपासून उपयुक्त वस्तू निर्मिती आणि पर्यावरण संवर्धनाचा ठोस संदेश सादर केला. त्याच्या प्रयोगातील वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता आणि सादरीकरणातील आत्मविश्वास यामुळे परीक्षकांची दाद मिळाली.
विशेष म्हणजे, ग्रामीण पार्श्वभूमीतून येऊन राज्यस्तरीय स्पर्धेत मिळवलेले हे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. अन्वयच्या या यशामागे त्याचे कष्ट, जिद्द आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.
अन्वयच्या या यशाबद्दल शाळेतील शिक्षकवृंद, आई-वडील तसेच संपूर्ण परिसरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. विज्ञानाच्या वाटेवर झेप घेतलेल्या या चिमुकल्याने नायगावचे नाव उज्ज्वल करत भविष्यातील मोठ्या यशाची नांदी दिली आहे.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
नायगाव प्रतीनीधी:ग्रामीण मातीतून उगवलेल्या प्रतिभेने पुन्हा एकदा राज्याच्या पटलावर आपला ठसा उमटवला आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह ये...
By Admin
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
केशव पवार लोहा, तालुक्यातील पोखरी येथे कापसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अमली पदार्थविरोधी पथक आ...
-
यंदा आपल्या वयाचा अमृतमहोत्सव साजरा करत असलेले प्रा. विश्वास वसेकर हे समकालातील एक महत्त्वाचे ललितलेखक, कवी, संपादक, समीक्षक आणि अनुवादक आहे...
-
श्री आनंद दत्तधाम आश्रमात मुस्लिम बांधवांनी घेतला महाप्रसादाचा लाभ श्रीक्षेत्र माहूर माहूर गडावरील श्री आनंद दत्त धाम आश्रमाचे मठाधीश राष्...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
केशव पवार लोहा, तालुक्यातील पोखरी येथे कापसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अमली पदार्थविरोधी पथक आ...
-
यंदा आपल्या वयाचा अमृतमहोत्सव साजरा करत असलेले प्रा. विश्वास वसेकर हे समकालातील एक महत्त्वाचे ललितलेखक, कवी, संपादक, समीक्षक आणि अनुवादक आहे...
-
श्री आनंद दत्तधाम आश्रमात मुस्लिम बांधवांनी घेतला महाप्रसादाचा लाभ श्रीक्षेत्र माहूर माहूर गडावरील श्री आनंद दत्त धाम आश्रमाचे मठाधीश राष्...
-
(विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांना मिळणार नवे व्यासपीठ; विविध डिजिटल प्रकल्पांचे सादरीकरण) नांदेड :(दि.१५ सप्टेंबर २०२६) ...
-
नांदेडमध्ये शेतकरी आक्रमक; कागदी पाहणी अन् कोरड्या बैठका बंद करून थेट मदत देण्याची मागणी अर्धापूर/नांदेड : गेल्या दीड-दोन महिन्यांपासून पावस...
COMMENTS