पेनूर प्रतिनिधी :- महात्मा बसवेश्वर ते 12 व्या शतकातील एक महान भारतीय तत्त्ववेक्ता, समाजसुधारक आणि लिंगायत धर्माचे संस्थापक, स्त्री पुरुष समानता आणि लोकशाही मूल्याचा प्रसार यांच्या कार्यातून अनुभव मंडप स्थापन करून जातिभेद आयोजक संघर्ष करणाऱ्या आणि काय कायकैवे कैलास ( काम हीच पूजा ) या संदेशाच्या माध्यमातून समाज, बंधूभाव आणि समाज सुधारणा करणाऱ्या जबरदस्ती महात्मा बसवेश्वर त्यांचे कार्य आजही समाजासाठी खुप प्रेरणादायी असल्याचे मनोगत शालेय समिती सदस्य तथा पत्रकार विरभद्र एजगे यांनी केले.
जिल्हा परिषद हायस्कूल पेनुर येथे मुख्याध्यापक प्रलोभ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक बसूआप्पा धोंडे हे तर प्रमुख पाहुणे म्हणून सचिन तात्या धोंडे, माधव पाटील गवते, विलासआप्पा कंधारकर, शिवहार गोवखंडे, राजूआप्पा आराळे,दीपक धोंडे, बबलू आराळे,मन्मथ धोंडे, संग्राम आप्पा सुकणे, राजूआप्पा कंधारकर, नागनाथ आराळे प्रमुख व्याख्याते म्हणून सहशिक्षक रामलिंग नागठाणे यांची उपस्थिती होती.
यावेळी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून महात्मा बसवेश्वर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला तर प्रमुख व्याख्याते रामलिंग नागठाणे यांनी सखोल असं मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक प्रलोभ कुलकर्णी यांनीही आपल्या मनोगतातून महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
यावेळी हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रलोभ कुलकर्णी ,सहशिक्षक गंगाराम राऊत,रामलिंग नागठाणे,शिवाजी मोरे, माधव पवार, अनुप कंदुलवार यांच्या सह मोठया प्रमाणावर विध्यार्थी, गावकरी, पालक व शालेय समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगाराम राऊत तर आभार प्रदर्शन माधव पवार यांनी केले.

COMMENTS