स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भाषा, वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुलातील विद्यार्थिनी शितल देविदासराव हंबर्डे यांना इंग्रजी विषयात नुकतीच आचार्य (पीएच.डी.) पदवी प्रदान करण्यात आली आहे. शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ रोजी पार पडलेल्या मौखिकी परीक्षेत (Viva-voce) त्यांना यशस्वी घोषित करण्यात आले. विशेष म्हणजे, विष्णुपुरी नगरीतून ही सर्वोच्च पदवी संपादन करणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.
शितल देवीदासराव हंबर्डे यांनी "निवडक नयनतारा सहगल आणि अनिता देसाई यांच्या कादंबऱ्यांमधील लिंगभेदावर आधारित विभाजनाचे चित्रण: एक विषयात्मक अभ्यास"* (Gender-based Segregation in Selected Novels of Nayantara Sahgal and Anita Desai: A Thematic Study) या विषयावर आपले संशोधन सादर केले. त्यांनी आधुनिक काळातील दोन दिग्गज लेखिकांच्या साहित्यातून स्त्री-पुरुष भेदाभेद आणि सामाजिक विषमतेच्या पैलूंचे अत्यंत सूक्ष्म विश्लेषण केले आहे.
या संशोधनासाठी त्यांना डॉ. शैलजा बी. वाडीकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या मौखिकी परीक्षेसाठी बाह्य परीक्षक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथील इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. मुस्तजीब खान उपस्थित होते. सदर परीक्षेचे अध्यक्षपद भाषा व वाङ्मय संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर यांनी भूषविले.
या यशस्वी मौखिकी परीक्षेप्रसंगी डॉ. योगिनी सातारकर, उपकुलसचिव मेघश्याम साळुंके, विक्रम पवार, गोविंद हंबर्डे, साईनाथ मामीडवार, सुशील खरवडकर, दासराव हंबर्डे, अरुण भालेकर, शीला भालेकर, बाबू जिंकलोड, मुबीन अन्सारी, विशाल बोरगावकर, दिलीप गरड, रविसिंग तातु यांच्यासह संकुलातील प्राध्यापक आणि शोध विद्यार्थी उपस्थित होते.
शितल हंबर्डे यांनी मिळवलेल्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ग्रामीण भागातील आणि विशेषतः विष्णुपुरी परिसरातील पहिली महिला पीएच.डी. धारक होण्याचा मान त्यांनी मिळवल्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या या यशाबद्दल शिक्षण क्षेत्रातून तसेच आप्तेष्टांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS