नांदेड:(दि. १ एप्रिल २०२६)श्री. शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित मुलींच्या वस्तीगृहात यशवंत महाविद्यालय आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापी...
नांदेड:(दि. १ एप्रिल २०२६)श्री. शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित मुलींच्या वस्तीगृहात यशवंत महाविद्यालय आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ६ मार्च ते २५ मार्च दरम्यान २० दिवसीय भव्य योग शिबिर उत्साहात संपन्न झाले. माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार ताणतणाव व्यवस्थापन तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनींसाठी या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दि. ६ मार्चला शिबिराचे उद्घाटन डॉ. मनीषा जाधव यांच्या आरोग्यविषयक व्याख्यानाने झाले. शिबिरामध्ये विद्यार्थिनींना विविध योगासनांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिरासाठी योग प्रशिक्षक म्हणून प्रा.डॉ. रुद्रावती एस.चव्हाण आणि डॉ. एस. ए.तोष्णीवाल यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी विविध योगासनांच्या माध्यमातून ताण कसा कमी करावा आणि निरोगी जीवनशैली कशी अंगीकारावी, याबाबत सविस्तर माहिती व प्रात्यक्षिके सादर केली.
शिबिराची सांगता डॉ. किशोर अतनुरकर यांच्या मार्गदर्शनाने झाली. त्यांनी विद्यार्थिनींमध्ये ताणमुक्त जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण करत सकारात्मक विचारसरणी विकसित करण्यावर भर दिला.
शिबिरादरम्यान विद्यार्थिनींनी योगाच्या विविध क्रियांचा नियमित सराव करून ताणमुक्त आणि निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करण्याचा संकल्प केला. शेवटी विद्यार्थीनिंनी प्रतिक्रिया देताना, या शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ झाला असून शारीरिक व मानसिक आरोग्यात सकारात्मक बदल दिसून आल्याचे सांगितले.
कार्यक्रमाला डॉ. कविता केंद्रे, डॉ. नीताराणी जैस्वाल, डॉ. मीरा फड, प्रा. प्रियंका शिशोदिया, डॉ. दीप्ती तोटावार, एल. लंगडापुरे, लता जाधव ( किन्हाळकर), तृप्ती पवळे, शकुंतलाबाई शेळगांवकर , स्वरा पाटील, श्लोका पाटील, कवळे यांची उपस्थिती लाभली.
योग शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे, उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे, डॉ. हरिश्चंद्र पतंगे, प्रसिद्धी समन्वयक डॉ. अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्ष कालिदास बिरादार व गजानन पाटील यांनी सहकार्य केले.

COMMENTS