विद्या' शिक्षक पतसंस्थेत परिवर्तनाचे वारे; सत्ताधाऱ्यांच्या 'हेकेखोर' कारभारावर सभासदांचा संताप नांदेड: प्रतिनीधी विद्या...
विद्या' शिक्षक पतसंस्थेत परिवर्तनाचे वारे; सत्ताधाऱ्यांच्या 'हेकेखोर' कारभारावर सभासदांचा संताप
नांदेड: प्रतिनीधी
विद्या जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पत संस्था मर्यादित, नांदेडच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमुळे सध्या जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळात राजकारण तापले आहे. १९९६ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेत २०१६ पर्यंत निवडणुका बिनविरोध करण्याची आदर्श परंपरा होती, मात्र गेल्या काही वर्षांत घुसलेल्या राजकीय महत्त्वाकांक्षेचे सभासद संस्थेच्या पैशांचा अपव्यय होत असल्याचा आरोप सभासदांमधून होत आहे.सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोपांच्या फैरीसंस्थेच्या कारभारावर भाष्य करताना काही ज्येष्ठ सभासदांनी विद्यमान नेतृत्वावर गंभीर आरोप केले आहेत:लाभांशात कपात करण्याचा प्रयत्न: सभासदांना १०% लाभांश मिळणे अपेक्षित असताना, सत्ताधाऱ्यांकडून तो ५% पर्यंत मर्यादित ठेवण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे.आर्थिक अनियमितता आणि पारदर्शकतेचा अभाव: संस्थेचा लेखापरीक्षण वर्ग (Audit Class) लपवणे, थकबाकी आणि NPA ची खरी परिस्थिती दडवणे असे प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे.कायद्याचे उल्लंघन: सहकार कायद्यानुसार ठेवी जिल्हा मध्यवर्ती किंवा राष्ट्रीयकृत बँकेत ठेवणे बंधनकारक असताना, संस्थेचे लाखो रुपये एका नागरी सहकारी बँकेत बेकायदेशीरपणे ठेवल्याचे निदर्शनास आले आहे.संस्थेचे हित धोक्यात?विद्यमान संचालक मंडळाच्या उदासीनतेमुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मतदानाचा आणि उमेदवारीचा अधिकार संस्थेने गमावला आहे. तसेच, इमारतीसाठीचा निधी आणि गंगाजळीचा वापर वैयक्तिक फायद्यासाठी करून सभासदांना अडचणीत आणले जात असल्याची टीका होत आहे. १५ वर्षांत संस्थेला साधी हक्काची जागा किंवा प्रशस्त कार्यालयही घेता आले नाही, यावरून सत्ताधाऱ्यांच्या 'हित' जपण्याच्या गप्पा पोकळ असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.परिवर्तनाचे आवाहनसंस्थेतील 'खालच्या पातळीचे' राजकारण थांबवण्यासाठी आणि सभासदांच्या कष्टाच्या पैशांचे रक्षण करण्यासाठी आता बदलाची वेळ आली आहे. 'शिवण यंत्र' या चिन्हासमोरील शिक्का मारून परिवर्तनाचे साक्षीदार होण्याचे आवाहन जागरूक सभासदांकडून केले जात आहे. पतसंस्थेचे हीत लक्षात घेऊन सभासदांनी एकता पॅनल च्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे.असे आव्हान केले आहे.

COMMENTS