गेल्या पंचवीस- तीस वर्षापासून जिल्ह्याच्या मुख्य सत्तास्थानी असतांना बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्था, महत्त्वाच्या सर्व संस्थेत अशोकराव चव्हाण व त्यांच्या समर्थकांची एक हाती सत्ता आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी जिल्ह्यातील अन्य कोणत्याही पक्षाच्या नेत्याला मिळाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील कोणीही चांगल्या मोठ्या कामाचे श्रेय हे अशोकराव चव्हाण यांनाच दिले जात होते. नुकत्याच जाहीर झालेल्या एका अहवालानुसार राज्याचा आर्थिक विकासदर हा 10 ते 13 टक्के आहे. किमान विकासदर 7.3 आहे. नांदेड जिल्ह्याचा आर्थिक विकास दर हा त्याहीपेक्षा कमी 6.7 आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या अपयशाची जबाबदारी अशोकरावांनीच स्वीकारावी. जिल्ह्यातील कोणतीही निवडणूक पैशाच्या बळावर जिंकून नांदेड जिल्ह्याचा सातबारा हा अशोकराव चव्हाण यांच्याच नावे असल्याची शेखी मिरवणाऱ्यानी जिल्ह्याचा विकासदर राज्यात सर्वाधिक पिछाडीवर का आहे याची आत्मचिंतन करावे. जिल्ह्यात जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू नये जिल्ह्याचा विकास व्हावा यासाठी अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला ते राज्यसभा खासदार झाले मुलगी आमदार झाली महानगरपालिकेसह तर बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्था या त्यांच्याच अधिपत्याखाली असतानाही जिल्ह्यात कोणतेही मोठे औद्योगिक उद्योग चालू नाहीत, साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला योग्य भाव नाही, रोजगार निर्मिती नाही म्हणूनच नांदेड जिल्हा विकासदराच्या बाबतीत राज्यात सर्वाधिक पिछाडीवर गेला याची पूर्णता नैतिक जबाबदारी अशोकरावांनी स्वीकारावी असे आवाहन शिवसेनाप्रमुख शेतकरी सेनेचे प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद इंगोले यांनी केले
आपला
प्रल्हाद इंगोले,
शिवसेना शेतकरी नेते महाराष्ट्र राज्य

COMMENTS