मुदखेड (नांदेड): जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीविरोधात पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी मोठी कारवाई केली आहे. उपमह...
मुदखेड (नांदेड): जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीविरोधात पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी मोठी कारवाई केली आहे. उपमहानिरीक्षकांच्या विशेष पथकाने माळाकौठा येथील वाळू धक्क्यावर छापा टाकून तब्बल १ कोटी ४ लाख ५० हजार रुपयांचे साहित्य आणि वाळू जप्त केली आहे.
या प्रकरणी मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता आणि गौण खनिज अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक शिंदे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे, प्रदीप खानसोळे, संजीव जिंकलवाड, गणेश धुमाळ आणि कामाजी गवळी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शहाजी उमाप यांनी पथकाचे अभिनंदन करून त्यांना प्रशंसापत्र देऊन गौरविले आहे.
नागरिकांना आवाहन: "आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती नागरिकांनी जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा 'खबर हेल्पलाइन' ९१ ५० १०० १०० वर कळवावी, जेणेकरून अशा गुन्हेगारी प्रवृत्तीचा बिमोड करता येईल," असे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.
रात्रीच्या सुमारास धाडसी कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, माळाकौठा परिसरातील गोदावरी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा आणि साठवणूक होत असल्याचे समोर आले होते. या माहितीच्या आधारे, ६ मार्च २०२६ रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयातील पथकाने मुदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई केली.
काय काय झाले जप्त?गुन्हा दाखल व तपास सुरू
या कारवाईत पोलिसांनी वाळू उपसा आणि वाहतुकीसाठी वापरले जाणारे खालील साहित्य जप्त केले आहे:
दोन टाटा हायवा ट्रक. एक जेसीबी (JCB) मशीन. एक लोखंडी हॉपर आणि एक छोटी बोट. नदीपात्रातून काढून साठवून ठेवलेली ५० ब्रास वाळू.

COMMENTS