नांदेड (प्रतिनिधी)- येथील परशुराम चौकाची अवस्था अत्यंत दयनिय झाली असून परशुराम जयंतीपुर्वी या चौकाचे महापालिकेने सुशोभिकरण करावे, अशी मागणी ...
नांदेड (प्रतिनिधी)- येथील परशुराम चौकाची अवस्था अत्यंत दयनिय झाली असून परशुराम जयंतीपुर्वी या चौकाचे महापालिकेने सुशोभिकरण करावे, अशी मागणी अ.भा.ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष निखीलभाऊ लातूरकर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून परशुराम चौकात अवकळा पसरली आहे. कुठलीही साफसफाई होत नसल्यामुळे कचर्यांचा खच साचला आहे. काही भागाची मोडतोड सुद्धा झाली आहे. या भागाचे सुशोभिकरण करणे आवश्यक आहे. येत्या 19 एप्रिल रोजी परशुराम जयंती असून त्यानिमित्त या चौकात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. सुशोभिकरणाचे काम त्वरित हाती घेवून जयंतीपूर्वी ते पुर्ण करावे, अशी मागणी लातूरकर यांनी केली आहे. विशेष म्हणजे महापालिका प्रशासनाच्यावतीने नुकत्याच जाहीर केलेल्या 100 दिवसांच्या विकास कामांच्या यादीमध्ये परशुराम चौकाच्या सुशोभिकरणाचाही समावेश करावा, असे आवाहन निखील लातूरकर यांनी नुतन महापौर, उपमहापौर आणि मनपा आयुक्तांना केले आहे.

COMMENTS