युवानेते करण एंड्रलवार यांच्या हस्ते कार्यक्रम; शहराला मिळणार ‘ऑक्सिजन झोन’ किनवट प्रतिनिधी: वाढते प्रदूषण आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी र...
युवानेते करण एंड्रलवार यांच्या हस्ते कार्यक्रम; शहराला मिळणार ‘ऑक्सिजन झोन’
किनवट प्रतिनिधी: वाढते प्रदूषण आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘घनवन’ (Micro Forest) योजनेचा किनवट शहरात युवानेते करण एंड्रलवार यांच्या शुभहस्ते दिमाखात शुभारंभ करण्यात आला. अत्यंत कमी जागेत दाट जंगल तयार करण्याच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे शहराला भविष्यात हक्काचा ‘ऑक्सिजन झोन’ मिळणार असल्याचे मत यावेळी करण एंड्रलवार यांनी व्यक्त केले.
सामाजिक वनीकरण विभागामार्फत शहरी भागात हरित क्षेत्र वाढविण्याच्या उद्देशाने ‘घनवन’ ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत एकाच ठिकाणी विविध प्रजातींची झाडे लावून नैसर्गिक जंगलाच्या तुलनेत सुमारे दहा पट वेगाने वाढणारे दाट जंगल तयार केले जाते.
नांदेड येथील सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनाधिकारी संदीप चव्हाण, सहायक वनसंरक्षक श्रीकांत जाधव आणि वनपरिक्षेत्र अधिकारी दिनकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट येथील सामाजिक वनीकरण कार्यालयाने ४ मार्च रोजी नगरपरिषद क्षेत्रातील डम्पिंग ग्राउंड येथे नारळ फोडून या योजनेचा शुभारंभ केला. या कार्यक्रमाला नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांचे चिरंजीव व शिवसेनेचे युवानेते करण एंड्रलवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना करण एंड्रलवार म्हणाले की, “वाढत्या शहरीकरणामुळे झाडांची संख्या कमी होत चालली आहे. ‘घनवन’ योजनेमुळे कमी वेळेत मोठ्या प्रमाणात हरित क्षेत्र निर्माण होईल, ज्यामुळे परिसरातील तापमानात घट होण्यास मदत होईल.”
कार्यक्रमात सामाजिक वनीकरण कार्यालयाचे कर्मचारी टी. ए. देवकते यांनी ‘घनवन’ योजनेबाबत सविस्तर माहिती दिली. दाट झाडांमुळे धूलिकण आणि आवाजाच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवता येते. तसेच शहरांमधून नामशेष होणाऱ्या पक्षी व फुलपाखरांना नवीन आश्रयस्थान मिळते. याशिवाय घनवनामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाणही वाढते, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष हसन लाला, बांधकाम सभापती राम नेमानीवार, प्रभू कोल्हे, अनवर मिर्झा, साहिल सर, नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक अशोक भालेराव, स्वच्छता कर्मचारी रियाज,शिवसेनेचे शहर प्रमुख प्रशांत कोरडे, तसेच सामाजिक वनीकरण कार्यालयाचे कर्मचारी बी. एस. भुरके, एच. डी. खामकर, शेख रसूल गुलाम, अंकुश राठोड, वेद राठोड यांच्यासह स्थानिक नागरिक व वनप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS