नांदेड: (दि.८ मार्च २०२६) संशोधन क्षेत्रातील आधुनिकता आणि सुसूत्रता लक्षात घेऊन, यशवंत महाविद्यालयाने संशोधक, मार्गदर्शक आणि प्राध्यापकांसा...
नांदेड: (दि.८ मार्च २०२६) संशोधन क्षेत्रातील आधुनिकता आणि सुसूत्रता लक्षात घेऊन, यशवंत महाविद्यालयाने संशोधक, मार्गदर्शक आणि प्राध्यापकांसाठी ‘शोधचक्र’ संशोधन कार्यप्रणाली व्यवस्थापन प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन प्रशिक्षण आणि जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरु प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांचे मार्गदर्शन व अध्यक्षतेखाली इन्फ्लिबनेट सेंटर, गांधीनगर, गुजरात व यशवंत महाविद्यालय ग्रंथालय यांच्यावतीने हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
संशोधकांसाठी डिजिटल व्यासपीठ ‘शोधचक्र’ हे प्लॅटफॉर्म संशोधनाच्या सुरुवातीपासून ते प्रबंध सादर करण्यापर्यंतच्या सर्व टप्प्यांवर संशोधक विद्यार्थी आणि त्यांच्या पर्यवेक्षकांना तांत्रिक सहाय्य करण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. या सत्राचा मुख्य उद्देश संशोधन कार्याचे अचूक व्यवस्थापन करणे, कामाच्या प्रगतीचा मागोवा घेणे आणि शैक्षणिक नियमांचे व गरजांचे पालन करणे, याविषयी सविस्तर माहिती देणे हा आहे.
सत्राचे नियोजन आणि नोंदणी हे प्रशिक्षण सत्र११ मार्च रोजी सकाळी ११:०० ते १२:०० या वेळेत गूगल मीट ऑनलाइन माध्यमातून पार पडणार आहे.
या कार्यक्रमात प्राध्यापक, संशोधन मार्गदर्शक, संशोधक विद्यार्थी आणि नोडल अधिकारी तथा ग्रंथपाल यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नोडल अधिकारी तथा ग्रंथपाल डॉ. कैलास वडजे यांनी केले आहे..
संशोधन कार्याला गती देण्यासाठी आणि तांत्रिक बाबी समजून घेण्यासाठी हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

COMMENTS