नवी दिल्ली/नांदेड: नांदेड आणि संपूर्ण मराठवाड्यातील प्रवाशांची मोठी गैरसोय लक्षात घेऊन, खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी रेल्वेमंत्री अश्...
नवी दिल्ली/नांदेड: नांदेड आणि संपूर्ण मराठवाड्यातील प्रवाशांची मोठी गैरसोय लक्षात घेऊन, खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन एक महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून हडपसर स्थानकापर्यंत मर्यादित करण्यात आलेली गाडी क्रमांक १७६३० हुजूर साहिब नांदेड-पुणे एक्स्प्रेस पुन्हा पूर्वीप्रमाणे पुणे मुख्य स्थानकापर्यंत चालवावी, असे साकडे त्यांनी निवेदनाद्वारे घातले आहे.
वेळेची अडचण: ही ट्रेन पहाटे ४:३५ वाजता हडपसरला पोहोचते. इतक्या पहाटे तिथे कोणतीही पीएमपीएल (PMPL) बस सेवा उपलब्ध नसते.
आर्थिक फटका: सार्वजनिक वाहतूक नसल्यामुळे प्रवाशांना खासगी रिक्षा किंवा टॅक्सीसाठी अव्वाच्या सव्वा पैसे मोजावे लागत आहेत.
रुग्णांची परवड: पुणे स्टेशनच्या जवळ ससून रुग्णालय, रुबी हॉल क्लिनिक आणि जहांगीर हॉस्पिटल यांसारख्या मोठ्या आरोग्य संस्था आहेत. हडपसरला उतरल्यामुळे गंभीर रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
सुरक्षेचा प्रश्न: पहाटेच्या वेळी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही या निमित्ताने ऐरणीवर आला आहे.
मराठवाड्याची जीवनवाहिनी
नांदेड-पुणे रेल्वे ही मराठवाड्यासाठी शैक्षणिक, आर्थिक आणि वैद्यकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे. हा निर्णय बदलल्यास लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता रेल्वे मंत्रालय यावर काय सकारात्मक पाऊल उचलते, याकडे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागले आहे.
प्रवाशांच्या हालपेष्टांकडे वेधले लक्ष
२६ जानेवारीपासून या ट्रेनचा प्रवास पुणे स्टेशनऐवजी हडपसरलाच थांबवण्यात आला आहे. या निर्णयामुळे उद्भवणाऱ्या समस्यांची जंत्रीच खासदार चव्हाणांनी रेल्वेमंत्र्यांसमोर मांडली:वेळेची अडचण: ही ट्रेन पहाटे ४:३५ वाजता हडपसरला पोहोचते. इतक्या पहाटे तिथे कोणतीही पीएमपीएल (PMPL) बस सेवा उपलब्ध नसते.
आर्थिक फटका: सार्वजनिक वाहतूक नसल्यामुळे प्रवाशांना खासगी रिक्षा किंवा टॅक्सीसाठी अव्वाच्या सव्वा पैसे मोजावे लागत आहेत.
रुग्णांची परवड: पुणे स्टेशनच्या जवळ ससून रुग्णालय, रुबी हॉल क्लिनिक आणि जहांगीर हॉस्पिटल यांसारख्या मोठ्या आरोग्य संस्था आहेत. हडपसरला उतरल्यामुळे गंभीर रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
सुरक्षेचा प्रश्न: पहाटेच्या वेळी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही या निमित्ताने ऐरणीवर आला आहे.
"मराठवाडा आधीच सोयीसुविधांच्या अभावाशी झुंजत आहे. अशात जनभावनेच्या विरोधात घेतलेल्या या निर्णयामुळे प्रवाशांचा प्रतिसादही कमी होत आहे. रेल्वे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन ही ट्रेन पुन्हा पुणे स्टेशनपर्यंत सुरू करावी." — खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण

COMMENTS