नांदेड | प्रतिनिधी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने चेन्नई येथे पार पडलेल्या राष्ट्रीय युवक महोत्सवात तब्बल २६ वर्षांनंतर ऐतिहासिक...
नांदेड | प्रतिनिधी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने चेन्नई येथे पार पडलेल्या राष्ट्रीय युवक महोत्सवात तब्बल २६ वर्षांनंतर ऐतिहासिक 'सुवर्ण' यश संपादन केले आहे. देशातील १४२ नामांकित विद्यापीठांच्या चुरशीच्या स्पर्धेत विद्यापीठाने लोक/आदिवासी नृत्य (दंडार) प्रकारात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
१०० टक्के यशाची नोंद: विद्यापीठाने सहभाग घेतलेल्या सर्व ७ कलाप्रकारांत पारितोषिके मिळवून आपला दबदबा निर्माण केला:
प्रथम क्रमांक: लोकनृत्य (दंडार) आणि रॅली/मिरवणूक.
द्वितीय क्रमांक: माईम (मूक अभिनय), लोक वाद्यवृंद, शास्त्रीय वाद्य एकल आणि लघुनाटिका.
पाचवा क्रमांक: संकल्पना नृत्य.
आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी: या दैदिप्यमान यशामुळे विद्यापीठाचा संघ आता आंतरराष्ट्रीय युवक महोत्सवात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झाला आहे. कुलगुरू डॉ. मनोहर चासकर आणि विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे यश खेचून आणले आहे.

COMMENTS