नांदेड | प्रतिनिधी शहरातील चिखलवाडी कॉर्नर ते गुरुद्वारा चौरस्ता या मुख्य रस्त्याचे खोदकाम मागील महिनाभरापासून अर्धवट अवस्थेत पडले आहे. याचा...
नांदेड | प्रतिनिधी शहरातील चिखलवाडी कॉर्नर ते गुरुद्वारा चौरस्ता या मुख्य रस्त्याचे खोदकाम मागील महिनाभरापासून अर्धवट अवस्थेत पडले आहे. याचा मोठा फटका स्थानिक व्यापारी आणि दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना बसत असून, प्रशासनाच्या या दिरंगाईविरुद्ध आज व्यापाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. सामाजिक कार्यकर्ते काश्मीरसिंग भट्टी आणि व्यापारी संकुलनाच्या वतीने आज, २७ फेब्रुवारी २०२६ रोजी नांदेड महानगरपालिकेच्या मुख्य अभियंत्यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले.भाविकांची गैरसोय आणि आर्थिक नुकसान
तख्त सचखंड श्री हुजूर साहेब गुरुद्वारा दर्शनासाठी पंजाबसह देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक नांदेडमध्ये येत असतात. रेल्वे स्टेशन ते मोंढा हा मुख्य रस्ता असल्याने येथे वाहनांची आणि पादचाऱ्यांची मोठी वर्दळ असते. मात्र, महानगरपालिकेने रस्ता बनवण्यासाठी महिनाभरापूर्वी खोदकाम करून ठेवले आहे. यामुळे:
- धूलिकण आणि खड्ड्यांमुळे व्यापाऱ्यांच्या व्यवसायाचे मोठे नुकसान होत आहे.
- पायी चालणाऱ्या यात्रेकरूंना आणि वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
- वाहतूक कोंडीमुळे तासनतास वेळ वाया जात आहे.
- होळीपूर्वी काम पूर्ण करण्याची मागणी काही दिवसांवरच होळीचा सण येऊन ठेपला आहे. होळीनिमित्त लाखो भाविक नांदेडमध्ये दाखल होतात. ही गर्दी लक्षात घेता, होळीपूर्वी या रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. "जर प्रशासनाने त्वरित हालचाल केली नाही, तर व्यापारी वर्गाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल," असा इशारा यावेळी देण्यात आल
उपस्थित मान्यवर हे निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते कश्मीर सिंघ भट्टी,धरम सिंघ गडगंज,यांच्यासह मनिंदर सिंघ मिर्धा, हरभजनसिंघ भट्टी, व्यंकटी बालाजी पवार, संदीप रायवार, योगेश मामीडवार, सुशील कवटीकवार, विशाल जोशी,त्रिंबक चपटे, कैलाश मोदी, गजानन मुदीराज सैयद दलील साबह व इतर मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते.

COMMENTS