नांदेड प्रतिनिधी दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी सायन्स कॉलेजमध्ये विज्ञान मंडळाच्या वतीने भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले या प्रद...
नांदेड प्रतिनिधी दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी सायन्स कॉलेजमध्ये विज्ञान मंडळाच्या वतीने भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले या प्रदर्शनाचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड चे प्रकुल गुरु माननीय डॉक्टर अशोक महाजन यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष नांदेड एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष माननीय श्री डॉक्टर प्रवीण पाटील हे होते विज्ञान मंडळाचे समन्वयक डॉक्टर किरण शिल्लेवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले या प्रदर्शनामध्ये महाविद्यालयातील विविध विभागा च्या वतीने विज्ञान प्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले. त्यामध्ये मेंदू फुफुस मूत्रपिंड लहान आतडे जुडवा मुलं यांची प्रदर्शनी भरविण्यात आली सायन्स कॉलेजच्या सोबत एम ओ यु असलेले नांदेडचे ग्रामीण पॉलीटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगांचे सादरीकरण केले या कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रोफेसर डॉक्टर्सवरुणा राजेंद्र शुक्ला यांची उपस्थिती होती तसेच या कार्यक्रमात डॉक्टर पी एस बोरकर डॉक्टर बी आर कुलकर्णी डॉक्टर व्ही व्ही कुलकर्णी डॉक्टर आर्वी सांगवीकर डॉक्टर एस एस मोदी प्राध्यापक सीमा पांडे प्राध्यापक माया राऊत आधी उपस्थित होते. परीक्षक म्हणून डॉ शैलजा वडजे व डॉ दीप्ती तोटावार यांनी कार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य प्राध्यापक खिल्लारे तसेच आभार प्रदर्शन डॉक्टर विशाल मराठे यांनी केले या विज्ञान प्रदर्शनात ऑक्सफर्ड ग्लोबल स्कूल शाकुंतल स्कूल विवेक वर्धिनी शाळा व अन्य इतर शाळेतील विद्यार्थी व कनिष्ठ व वरिष्ठ सायन्स महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. व विज्ञान प्रदर्शनी मध्ये प्रात्यक्षिकात त्यांनी सुद्धा सहभाग नोंदविला.

COMMENTS