नांदेड: मराठवाड्यातील अवैध व्यवसायांविरुद्ध पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) श्री. शहाजी उमाप यांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत अहमद...
नांदेड: मराठवाड्यातील अवैध व्यवसायांविरुद्ध पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) श्री. शहाजी उमाप यांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत अहमदपूर (जि. लातूर) येथे बेकायदेशीर वाळू साठ्यावर छापा टाकून तब्बल २ कोटी २१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यासोबतच परिक्षेत्रातील किनगाव, कळमनुरी, मुदखेड आणि गंगाखेड भागातही मटका व अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यात आली आहे.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:
६ टाटा हायवा ट्रक.
०१ जेसीबी मशीन.
2२० ब्रास वाळू साठा.
एकूण किंमत: २ कोटी २१ लाख रुपये.
या प्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि पर्यावरण संरक्षण अधिनियमांतर्गत ७ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परिक्षेत्रात इतर ५ ठिकाणी कारवाया
DIG शहाजी उमाप यांच्या पथकाने मागील दोन दिवसांत नांदेड, लातूर, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातही धडक कारवाया केल्या आहेत:
जिल्हा पोलीस ठाणे प्रकार जप्त मुद्देमालनांदेड मुदखेड वाळू
२ टिपर, १ हायवा, १० ब्रास वाळू (१९ लाख रु.)
नांदेड उमरी मटका
नगदी रक्कम व ३ मोबाईल
हिंगोली कळमनुरी मटका
४२,१७० रुपये (नगदी व मोबाईल)
लातूर किनगाव मटका
४४,११० रुपये (नगदी व ६ मोबाईल) परभणी गंगाखेड जुगार
१,३०,११० रुपये (१९ आरोपी अटक)
नागरिकांना प्रशासनाचे आवाहन
अवैध व्यवसायांचा बिमोड करण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे. कोणत्याही अवैध कामाची माहिती असल्यास नागरिकांनी 'खबर' हेल्पलाईन ९१ ५० १०० १०० वर किंवा nandedrange.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे त्यांनी म्हटले आहे.
सदर कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे, प्रदिप खानसोळे, संजीव जिंकलवाड, गणेश धुमाळ आणि कामाजी गवळी यांचा सहभाग होता.
अहमदपुरात मध्यरात्री छापा; ६ हायवा आणि जेसीबी जप्त
नांदेड जिल्ह्यातून होणाऱ्या अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीला चाप लावण्यासाठी DIG कार्यालयातील विशेष पथकाने २६ फेब्रुवारी रोजी रात्री ९:४५ च्या सुमारास अहमदपूर-नांदेड रोडवरील रुई शेत शिवारामध्ये ही कारवाई केली. या ठिकाणी नांदेडहून हायवाच्या सहाय्याने वाळू आणून तिची साठवणूक केली जात होती आणि त्यानंतर लातूर जिल्ह्यासह इतर ठिकाणी पुरवठा केला जात होता.जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:

COMMENTS