शिवचरित्राच्या जागराने किनवटमध्ये उसळला उत्साह; शेकडो शिवप्रेमींची उपस्थिती किनवट : प्रतिनिधी : इतिहास हा केवळ अभ्यासाचा विषय नसून तो स्वाभि...
शिवचरित्राच्या जागराने किनवटमध्ये उसळला उत्साह; शेकडो शिवप्रेमींची उपस्थिती
किनवट : प्रतिनिधी : इतिहास हा केवळ अभ्यासाचा विषय नसून तो स्वाभिमान, प्रेरणा आणि परिवर्तनाची ज्वाला आहे. इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणाऱ्यांचा इतिहास कधीच विसरता येत नाही, असे प्रतिपादन प्रख्यात वक्ते नितीन बानगुडे पाटील यांनी केले.
येथील गोंडराजे शंकरशहा रघुनाथशहा मैदान येथे आयोजित शिवचरित्र व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमास शेकडो शिवप्रेमी नागरिकांची उपस्थिती लाभली होती.
व्याख्यानाच्या प्रारंभी बानगुडे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत संघटनशक्ती, दूरदृष्टी, लोककल्याणकारी राज्यकारभार आणि स्वराज्याची संकल्पना यांचे महत्त्व विशद केले. जगात सर्वाधिक पुतळे आणि स्मारके जर कोणाची उभारली गेली असतील, तर ती शिवरायांचीच, असे सांगत त्यांनी शिवचरित्राच्या वैश्विक प्रभावावर प्रकाश टाकला.
दक्षिण दिग्विजयाच्या संदर्भात त्यांनी श्रीशैलम येथील पातळगंगेच्या काठी उभारण्यात आलेल्या गोपुराचा उल्लेख केला. अपूर्ण राहिलेले बांधकाम महाराजांच्या पुढाकाराने पूर्णत्वास गेले आणि त्यांच्या कार्याच्या सन्मानार्थ तेथेच पुतळा उभारण्यात आल्याची ऐतिहासिक नोंद त्यांनी सांगितली.
“युवकांनी शिवरायांच्या इतिहासातून आत्मभान, कर्तृत्व आणि राष्ट्राभिमानाची प्रेरणा घ्यावी,” असे आवाहन करत शिवचरित्र हे केवळ गौरवगीत नसून कृतीची दिशा देणारे जीवनमूल्य असल्याचा संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमाचे आयोजन हुतात्मा गोंडराजे शंकरशहा–रघुनाथशहा विचारमंच मैदान येथे करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या बेबीताई प्रदीप नाईक होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा सुजाता विनोद एंड्रलवार उपस्थित होत्या. सूत्रसंचालन बाळकृष्ण कदम यांनी केले, तर आभारप्रदर्शन बापूसाहेब तुप्पेकर यांनी केले.
यावेळी युवानेते करण एंड्रलवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे, वैजनाथ करपुडे पाटील, विनोद भरणे, माजी नगराध्यक्ष अरुण आळणे, के. मूर्ती, अमरदीप कदम आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात महिला वर्गाचा लक्षणीय सहभाग नोंदविण्यात आला.

COMMENTS