नांदेड:( दि. २७ फेब्रुवारी २०२६) यशवंत वार्षिक युवक महोत्सवात माजी प्र-कुलगुरु प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार ...
नांदेड:( दि. २७ फेब्रुवारी २०२६) यशवंत वार्षिक युवक महोत्सवात माजी प्र-कुलगुरु प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार पोस्टर सादरीकरण स्पर्धा दि.२५ फेब्रुवारी रोजी उत्साहात संपन्न झाली प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. संजय ननवरे यांच्या समन्वयातून विज्ञान व तंत्रज्ञान, कला व वाणिज्य, व्यवस्थापन विद्याशाखेतील एकूण १९० पोस्टर्स सादर झाले. कला शाखेसाठी परीक्षक पीपल्स कॉलेज येथील डॉ. विकास सुकाळे व सामाजिक शास्त्र संकुल, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथील डॉ.बाबुराव जाधव होतेविज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी परीक्षक गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालय, पूर्णा येथील डॉ. संजय दळवी व इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालयातील डॉ. ए.आर.अपस्तंभ होते वाणिज्य व्यवस्थापन विद्या शाखेसाठी परीक्षक डॉ जी.टी.वाघमारे, प्रतिभा निकेतन महाविद्यालय व डॉ.दीनानाथ बच्चेवार, शंकरराव चव्हाण महाविद्यालय, अर्धापूर होते. उपस्थित परीक्षकांचे स्वागत डॉ. नीरज पांडे, डॉ.संजय नंनवरे, डॉ. एम. ए. बशीर, डॉ. शिवराज बोकडे, डॉ.धनराज भुरे, डॉ.डी.डी.भोसले, प्रा.भारती सुवर्णकार, डॉ. राजरत्न सोनटक्के, डॉ. ए. एस.कुवर आदींनी केले.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे, उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे, डॉ. हरिश्चंद्र पतंगे, डॉ. पद्माराणी राव, डॉ. प्रवीणकुमार मिरकुटे, डॉ.व्हि.सी. बोरकर, डॉ. एम.एम.व्ही.बेग, डॉ. मीरा फड, डॉ. कविता केंद्रे, डॉ. नितारानी जयस्वाल,प्रा. साहेबराव माने, प्रा.अर्जुन गुरखुदे, डॉ.मदन अंभोरे, प्रा. नारायण गव्हाणे यांची उपस्थिती होती.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी डॉ. अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, परमेश्वर राठोड, अन्सारी अफसर, किशन इंगोले,शंकर मीरेवाड, सौ.काकडे पी. ए., सौ.मनीषा बाचोटीकर यांनी सहकार्य केले.

COMMENTS