महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार परमपूज्य हभप समाधान महाराज शर्मा केजकर यांचे धर्माबाद तालुक्यातील येताळा येथे दिनांक 23 फेब्रुवारी रोज सोमवारी रात्री नऊ वाजता भव्य कीर्तन आयोजित करण्यात आले आहे
धर्माबाद तालुक्यातील येताळा येथील श्रीकृष्ण मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कळसारोहन कार्यक्रमानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन व प्रसिद्ध कथाकार हभप योगेश महाराज अग्रवाल यांची श्रीमद् भागवत कथा आदी धार्मिक कार्यक्रम श्री येताळेश्वर देवस्थान व श्रीकृष्ण मंदिर येताळा येथे होत आहेत. दरम्यान कीर्तन महोत्सवात सोमवारी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार
हभप समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन होणार आहे. किर्तनात हार्मोनियमची साथ हभप संतोष महाराज शर्मा हे देतील
धार्मिक कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन येताळा येथील समस्त गावकरी मंडळीच्या वतीने करण्यात आले आहे.
..

COMMENTS