दहा हजार भाविक भक्तांची उपस्थिती......
भव्य दिव्य कार्यक्रमाचे नियोजन.....
नरेंद्र येरावार उमरी तालुक्यातील श्रीक्षेत्र नागठाणा येथील श्री शिवयोगी निर्वाणी मठ संस्थानाचे उत्तराधिकारी म्हणून
वेदमूर्ती बस्वराज स्वामी महाराज यांचा पट्टाभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने दिनांक 28 फेब्रुवारी व एक मार्च दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या धार्मिक कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, साधू, संत, महंत, शिवाचार्य, बालयोगी, तपस्वी, आचार्य, वेदांताचार्य, सद्गुरु यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमास पंचक्रोशीतील जवळपास दहा हजार भाविक भक्तांची उपस्थिती राहील त्या दृष्टिकोनातून पट्टाभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे.
दिनांक 28 फेब्रुवारी रोज शनिवारी सकाळी सात वाजता श्रीच्या संजीवन समाधीस रुद्राभिषेक, आठ वाजता धर्म ध्वजारोहण व पंचाचार्य पूजन, साडेनऊ वाजता ग्रंथराज परमरहस्य पारायण, दुपारी अडीच वाजता पारायणाची सांगता व महाप्रसाद, सायंकाळी पाच वाजता
हरीद्रालेपण, रात्री आठ वाजता प्रवचन कीर्तन आणि शिवजागरण.
दिनांक एक मार्च रोज रविवारी पहाटे पाच वाजता शिवपाठ, सहा वाजता श्रीच्या संजीवन समाधीस रुद्राभिषेक, सात वाजता वेदमूर्ती बस्वराज स्वामी यांचा पट्टाभिषेक सोहळा, सकाळी नऊ वाजता धर्मसभा आणि संगीत कार्यक्रम होईल त्यानंतर सकाळी 11 वाजता भव्य शोभायात्रा आणि दुपारी दोन वाजता महाप्रसाद.
या पट्टाभिषेक सोहळ्यासाठी श्री प.पू. ष.ब्र. 108 वेदांताचार्य शिवाचार्य रत्न सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज साखरखेरडेकर बाबा यांचे गुरुत्व लाभणार असून श्री प.पू. ष.ब्र. 108 सद्गुरु काशिनाथ शिवाचार्य महाराज (कांचबसवेश्वर मठ संस्थान पाथरी) यांचे साक्षीत्व लाभणार आहे.
हा भव्य दिव्य पट्टाभिषेक सोहळा यशस्वी करण्यासाठी पट्टाभिषेक सोहळा समिती, श्री शिवयोगी निर्वाण मठ संस्थान नागठाणा, समस्त गावकरी मंडळी, शिष्य मंडळीच्या वतीने परिश्रम घेतले जात आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात पट्टाभिषेक सोहळा पार पडण्याची तालुक्यातील ही पहिलीच वेळ असल्याने याकडे सर्वांचे लक्ष आकर्षित होत आहे. यापूर्वी याच मठ संस्थानात निर्वाणरूद्र पशुपती शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा कार्यकाळ झाला. ते शिव झाल्यानंतर या संस्थानात उत्तराधिकारी म्हणून वेदमूर्ती बस्वराज स्वामी महाराज यांचा पट्टाभिषेक सोहळा होत आहे

COMMENTS