मुखेड (विठ्ठल कल्याणपाड )मुखेड तालूका हा डोंगराळ भाग असल्यामुळे तालुक्यातील कर्नाटक व तेलंगणा राज्याच्या परिसरात वनविभागाच्या दुर्लक्षामुळे बेसुमार वृक्षतोड होत आहे .अशा बेसुमार वृक्षतोडीमुळे परिसर भकास दिसत आहे मुखेड तालुक्यातील बारहाळी , मुक्रमाबाद, जाहुर, राजूरा, आंबुलगा , ईडग्याल ही गावे कर्नाटक व तेलंगणा राज्याच्या अगदी जवळ असल्यामुळे येथून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून राज्यात व परराज्यात लाकूड अवैध मार्गाने विकले जात आहे .यामुळे पावसाचे प्रमाण घटत चालले आहे .'महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६' या कायद्यामध्ये असलेल्या तरतुदी आता इतक्या कालबाह्य झाल्या आहेत की त्यामुळे अवैधवृक्षतोडीला आळा बसण्याऐवजी तिला प्रोत्साहनच मिळत आहे.राज्यात 'महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (विनियमन) अधिनियम १९६४' हादेखील अस्तित्वात आहे. या अधिनियमातील नियमानुसार सोळा प्रकारच्या प्रजातीची झाडे तोडण्यास प्रतिबंद करण्यात आला असून त्यांना कायद्याने संरक्षण देण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने साग, आंबा, फणस, खारफुटी, खैर, मोह, चंदन, चिंच, अंजन, बिजा, तिवस, हलडू, ऐन, किंजळ, हिरडा व जांभूळ या वृक्षांचा समावेश आहे. या संरक्षित झाडांपैकी कोणतेही झाड तोडावयाचे असेल तर वनखात्याकडे अर्ज करून नियमानुसार परवानगी घ्यावी लागते. कायद्यातील तरतुदीनुसार या सोळा झाडांपैकी एखादे झाड निजीर्व किंवा रोगट झाले असेल किंवा वाऱ्याने पडले असेल किंवा वनसंवर्धनाच्या दृष्टीने पूर्णतावस्थेत पोहाचले असेल किंवा त्यामुळे कार्यक्षमरीत्या लागवड करण्यास अडथळा होत असेल तरच वृक्षतोडीसाठी परवानगी देण्यात येते. या कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदीनुसार अर्जदाराला जेवढी झाडे तोडण्यासाठी परवानगी देण्यात आली असेल तेवढीच, पण त्याच किंवा अन्य जातीची झाडे त्याच जागी किंवा अन्य सुयोग्य जागी अर्जदाराने लावणे बंधनकारक आहे. जर अशी झाडे वृक्षतोडीचा परवाना ज्याच्या नावे दिला जातो त्याने लावली नाहीत तर सरकारच्या वतीने परिक्षेत्र वन अधिकाऱ्याने ती लावावयाची आहेत व त्यावर होणार खर्च ज्याच्या नावे वृक्षतोडीचा परवाना देण्यात आला आहे त्याच्याकडून महसुली वसुली म्हणून व्याजासहीत वसूल करावयाचा आहे.पण अशा कायदा व नियमाना मुक्रमाबाद , बाऱ्हाळी , जाहूर , राजूरा, आंबुलगा , ईडग्याल परिसरातील अवैधरीत्या वृक्षतोड करणारे दलाल केराची टोपली दाखवत आहेत .एकीकडे शासन झाडे लावा झाडे जगवा अशी घोषणा रुपी जाणीव जागृती संकल्प करीत असताना मुक्रमाबाद, बाऱ्हाळी,जाहूर, राजुरा , आंबुलगा परिसरात मोठ्या प्रमाणात क्षेत्र वनविभागाच्या ताब्यात असून ही वृक्षतोड करणारे माफिया वनविभागासोबत संगनमत करून झाडे तोडा परराज्यात विका असा जणू संकल्प केला असल्या सारखा वाटतो .तरी शासनाने याकडे लक्षदेऊन ही अवैधरीत्या केली जाणारी वृक्षतोड थांबवावी व संबंधीत वृक्षतोड करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
माहूर (प्रतिनिधी)महाराष्ट्र दिनाचे पावन पर्व आणि जनसामान्यांची सेवा या उद्देशाला समोर ठेवून, किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदा...
-
माहूर (प्रतिनीधी) रखरखत्या उन्हात जीवसृष्टीला दिलासा देण्याच्या उद्देशाने माहूर शहरात एक सामाजिक जाणीवेचा उपक्रम राबविण्यात आला आहे. पक्ष्या...
-
राम दातीर माहूर (प्रतिनिधी)माहूर शहरातील वाढती मोकाट कुत्र्यांची संख्या आणि त्यामुळे नागरिकांसह भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झ...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
माहूर (प्रतिनिधी)महाराष्ट्र दिनाचे पावन पर्व आणि जनसामान्यांची सेवा या उद्देशाला समोर ठेवून, किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदा...
-
माहूर (प्रतिनीधी) रखरखत्या उन्हात जीवसृष्टीला दिलासा देण्याच्या उद्देशाने माहूर शहरात एक सामाजिक जाणीवेचा उपक्रम राबविण्यात आला आहे. पक्ष्या...
-
राम दातीर माहूर (प्रतिनिधी)माहूर शहरातील वाढती मोकाट कुत्र्यांची संख्या आणि त्यामुळे नागरिकांसह भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झ...
-
राम दातीर माहूर (प्रतिनिधी)कुंभकोणम दुर्घटनेच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची व जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक )यां...
-
सामान्य कुटुंबातून जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर मोठ्या हुद्द्यावर गेलेली लोकं सामाजिक जाण, भान जोपासत सामाजिक दायित्व स्वीकारून गोरगरिबांसाठ...

COMMENTS