नांदेड: महावितरणतर्फे राज्यभरात राबविण्यात येत असलेल्या ‘स्मार्ट मीटर पंधरवाडा’ मोहिमेला नांदेड परिमंडळात (नांदेड, हिंगोली, परभणी) उदंड ...
नांदेड: महावितरणतर्फे राज्यभरात राबविण्यात येत असलेल्या ‘स्मार्ट मीटर पंधरवाडा’ मोहिमेला नांदेड परिमंडळात (नांदेड, हिंगोली, परभणी) उदंड प्रतिसाद मिळत आहे. ९ ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित या मोहिमेत आतापर्यंत ६,१३३ नवीन स्मार्ट मीटर्स यशस्वीपणे बसविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, जानेवारी २०२६ अखेरपर्यंत परिमंडळात आधीच २.०३ लाख मीटर्सचा टप्पा पूर्ण झाला होता.
जिल्हानिहाय झालेली प्रगती:
या विशेष मोहिमेत आतापर्यंत खालीलप्रमाणे टीओडी (Time of Day) स्मार्ट मीटर्स बसविण्यात आले आहेत:
नांदेड जिल्हा: ४,१६२ मीटर्स
परभणी जिल्हा: १,००५ मीटर्स
हिंगोली जिल्हा: ९६६ मीटर्स
COMMENTS