वलांडी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंतीनिमित्त देवणी तालुक्यातील हिसामनगर ( माटेगडी) येथे छत्रपती शि...
वलांडी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंतीनिमित्त देवणी तालुक्यातील हिसामनगर ( माटेगडी) येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने सुप्रसिद्ध शिवव्याख्याते शिवश्री शामराव लवांडे यांचे "छत्रपती शिवाजी महाराज आणि आजची युवा पिढी" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हे व्याख्यान बुधवार, दिनांक, 18 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी ठीक 07 : 30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळा परिसरात होणार आहे.
शिवव्याख्याते शिवश्री शामराव लवांडे हे लातूर येथील सरस्वती विद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख व राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त एक उपक्रमशील शिक्षक असून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि आजची युवा पिढी या विषयावरती महाराष्ट्रभर अनेक व्याख्याने दिली आहेत.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वर्तमानपत्रामध्ये लिखाण सुद्धा करतात.
तरी या व्याख्यानाचा लाभ सर्व शिवभक्तांनी उपस्थित राहून घ्यावा, असे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती हिसामनगर (माटेगडी) च्या वतीने करण्यात आले आहे

COMMENTS