सहा दशकाइन अधिक काळा पासून ग्राहकांच्या विश्वासाला पात्र ठरलेली मराठवाड्यातील आग्रहगण्य असलेली दि. नादेन मर्चट को-ऑप. बँकेच्या उपाध्यक्ष पदी अरुण श्रीहरी चालिकवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली ही निवड जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अध्यासी अधिकारी कुमार बारकुल यांनी जाहीर केले
नांदेड मर्चट बँकेचे उपाध्यक्ष लक्ष्मण संगेवार यांची बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर १२ फेब्रुवारी बँकेच्या संचालक मंडअची बैठक सहाय्यक निबंधक कार्यालयाचे अध्यासी अधिकारी कुमार . बारकुल यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकरा वाजता पार पडली
नामनिर्देशन वाखल करण्याच्या कालावधीत जेष्ठ संचालक अरुण चालिकवार यांचा एकमेव अर्ज आला तो वैद्य ठरला . निर्धारित वेळेनंतर निवडणूक प्रकियेचे अध्यासी अधिकारी श्री बारकुल यांनी अरुण चालिक यांची बँकेचे उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे जाहिर केले,बँकेचे माजी चेअरमन दिलीप कंदकुर्ते , विद्यमान अध्यक्ष लक्ष्मणराव संगेवार यांनी नवनिर्वाचित उपाध्यक्ष चालीकवार यांचा सत्कार केला व अभिनंदन केले
निवड प्रक्रियेसाठी बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री सनतकुमार बनवसकर,
प्रशासन अधिकारी प्रतिभा देशमुख सूरज बेरुळकर, सहायक प्रताप शिंदे, शिपाई सय्यद बशीर, यांचे सहकार्य लाभले यावेळी, बॅंकेचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, संचालक जी एस चिटमलवार , उमेश जालनेकर, रविकुमार कासलीवाल, ओमप्रकाश राखेवार, दीपक चनावार , श्रीकांत वट्टमवार , मनीष काला, कैलास राठी ,हरिहर धुतमल,उपस्थित होते . बँकेच्या प्रगतीसाठी आपणप्रयत्नशील राहू असा विश्वास नवनिर्वाचित उपाध्यक्ष अरुण चालिकवार यांनी व्यक्त केला

COMMENTS