प्रतिनिधी नांदेड दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी सायन्स कॉलेज मध्ये शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सर्वप्रथम शिवरायांच्...
प्रतिनिधी नांदेड दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी सायन्स कॉलेज मध्ये शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सर्वप्रथम शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पित करून अभिवादन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून इतिहासाचे गाढे अभ्यासक यशवंत कॉलेजचे इतिहास विभाग प्रमुख, रा से यो स्वारातीम विद्यापीठ नांदेड चे माजी संचालक डॉ शिवराज बोकडे यांनी शिवरायांचा खरा इतिहास, शेतकऱ्यां प्रति शिवरायांचे कार्य, महिला सक्षमीकरणात शिवरायांचे योगदान या विषयावर विचार मांडले, प्रमुख पाहुणे ना ए सो चे उपाध्यक्ष सीए डॉ प्रवीण पाटील यांनी वर्तमान काळातील शिवराज्याची संकल्पना व जनमनाचे योगदान यावर विचार व्यक्त केले. आणि डॉ अनंत राऊत यांची शिवरायांवर लिहिलेली कविता ए आय मध्ये रूपांतरित करून संगीतबद्ध रचना सभागृहात ऐकवून सर्वांना मंत्रमुग्ध केले. तसेच डॉ विशाल मराठे यांनी पर्यावरण संरक्षण व संवर्धन यामध्ये शिवरायांचे योगदान या विषयावर आपले मत मांडले, तसेच डॉ ए टी शिंदे यांनी मा जिजाऊ यांनी शिवरायांवर केलेले संस्कार व मातृ देवो भव: ही संकल्पना शिवरायांच्या माध्यमातून आपल्या विचारातून मांडली. प्रा इ एम खिल्लारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा तुलनात्मक अभ्यास आपल्या विचारातून प्रस्तुत केले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो डॉ एल पी शिंदे यांनी जाणता राजा व रयतेचा राजा शिवराय कसा असावा याची मांडणी करण्यासाठी केलेले प्रयत्न सिद्ध करून व सुंदर आयोजनाद्वारे अध्यक्षीय समारोप केला. सायन्स महाविद्यालयाच्या उपप्राचार्य व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी तसेच स्टॉफ सेक्रेटरी प्रो डॉ अरुणा राजेंद्र शुक्ला यांनी कार्यक्रमाचे संयोजन, प्रस्तावना व सुंदर सूत्र संचालन केले. व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ ए पी बोरीकर यांनी केले. सायन्स महाविद्यालयाच्या मुलांच्या वस्तीगृहात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश मोखेडे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा आर एम आचेगावे यांनी केले. याप्रसंगी डॉ बालाजी कोम्पलवार, डॉ डी आर मुंडे, डॉ डी एम जाधव, प्रा अविनाश घाडगे, प्रा श्रीकांत दुलेवाड, डॉ रवी किरण नरवाडे, प्रा सुनील कदम, डॉ एन जे देशमुख, प्रा आर व्ही गावित, प्रा जयप्रकाश दुवे, प्रा द्रोणाचार्य, प्रा कपिल धूतमल, प्रा चेताली काकडे, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये रजिस्ट्रार गौतम वाघमारे, केशव गंगासागरे, शंकर कदम, शंकर पतंगे, महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवजयंती सोहळा महाविद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला.

COMMENTS