बिलोली प्रतिनिधी बिलोली शहरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांच...
बिलोली प्रतिनिधी बिलोली शहरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले तर ज्येष्ठ नागरिक वैजनाथराव मेघमाळे यांच्या हस्ते भगवा ध्वज फडकविण्यात आला. तद्नंतर येथील फरांदे होंडा शो रुम शाखा व सार्वजनिक शिवजयंती जयंती महोत्सवच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीराचे उद्घाटन नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी व सहाय्यक पोलीस निरीक्षक कमल शिंदे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.उद्घाटनप्रसंगी मुख्याधिकारी बालाजी मिठ्ठेवाड,नायब तहसीलदार परळीकर, उपनगराध्यक्ष अनुप अंकुशकर, गटनेता नागनाथ तुम्मोड भरत पवार.अभिजीत तुडमे इंद्रजित तुडमे आनंद बिराजदार.गगाधर पाटील नरवाडे, पपु नरवाडे, साईरूद्रुरकर ,हाणंमत यलमोड, रामपुरकर, सय्यद रियाज.,बाजीराव कोडलापुरकर ,राजू पाटील शिंपाळकर,दिलीप पांढरे, मारोती मालुसरे , भाऊसाहेब बनबरे, आदींची उपस्थिती होती.या शिबिरात ३० जणांनी रक्तदान केले.रक्तदात्यात उपविभागीय पोलिस अधिकारी शाम पानेगावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक कमल शिंदे, पोलिस उपनिरीक्षक सुर्यकांत तिडके, शिवराज लोखंडे,भरत पवार, नगरसेवक शिवाजी गायकवाड, यांच्यासह होंडा शोरूमचे तुकाराम शिंदे, श्रीनिवास मालुसरे यांच्यासह ३० जणांनी रक्तदान केले. रक्तदान शिबीर यशस्वीतेसाठी सहभाग व परिश्रम घेतलेल्या सर्वांचे फरांदे होंडा शो रुमचे व्यवस्थापक प्रल्हाद सुर्यवंशी यांनी आभार मानले.

COMMENTS