नांदेड (दि. ४ जानेवारी २०२६)
यशवंत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कक्षाद्वारे आयोजित मौजे येळेगाव येथील शिबिरात राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. अजय गव्हाणे यांनी विविध ध्यानधारणा प्रयोगांनी शिबिरार्थ्यांना ध्यानमग्न केले.
माजी प्र-कुलगुरु डॉ. प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांचे मार्गदर्शन आणि नियोजनानुसार योगासने आणि ध्यानसत्राचे आवर्जून आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ध्यानमंचावर जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ.रमेश चिल्लावार, कार्यक्रमाधिकारी डॉ.कैलाश इंगोले, डॉ.राजरत्न सोनटक्के, प्रा. अभिनंदन इंगोले यांची उपस्थिती होती.याप्रसंगी लिसनिंग मेडिटेशन, सायलेंट सीटिंग, नृत्य ध्यान, हास्य ध्यान, मौनधारणा आदी ध्यानप्रयोग अत्यंत उत्साह व आनंदात संपन्न झाले. प्रारंभी प्रास्ताविक डॉ. कैलास इंगोले यांनी केले. शिबिर संचालक डॉ.अजय गव्हाणे यांनी, ध्यानधारणेसाठी निसर्ग सानिध्य, अव्यस्तता, शारीरिक सुदृढता व मौन इ. बाबी आवश्यक असल्याचे आवर्जून सांगितले. प्रमुख अतिथी डॉ.रमेश चिल्लावार यांनी, सर्व प्रकारच्या प्रदूषणाने आधुनिक माणूस त्रस्त आहे. त्यामध्ये सर्वात भयावह मनाचे प्रदूषण आहे. मनावर नियंत्रण व संयमासाठी ध्यानधारणा आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.सूत्रसंचालन शुभम डक यांनी केले तर शेवटी आभार अनुपकुमार मस्के यांनी मानले.शिबिराच्या यशस्वीतेसाठी अधीक्षक गजानन पाटील, निखिल सोनकांबळे, सुरज हैबते आदींनी सहकार्य केले.
COMMENTS