पीपल्स हायस्कूल येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी

 

 नांदेड -एज्युकेशन सोसायटी संचलित पीपल्स हायस्कूल येथे क्रांतीज्योती सावित्री फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरा करण्यात आली.

  याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष दुपार स्विफ्टचे इन्चार्ज राजश्री भालेराव, पर्यवेक्षक  प्रशांत चौधरी, सांस्कृतिक विभाग प्रमुख  व्ही. आर. चिलवरवार हे होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन    शाळेची विद्यार्थिनी दुर्गा जाधव व जीविका वैद्य, प्रास्ताविक उषा हिवरे व आभार सोनाक्षी गायकवाड हिने मानले. याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक  प्रशांत चौधरी यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच स्त्रियांना  शिक्षणाची दारे उघडली म्हणूनच अनेक क्षेत्रांमध्ये स्त्रियांनी उज्वल यश संपादनकरीत आहेत. असे सांगून विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करून यशस्वी व्हावेअसे आवाहन केले. याप्रसंगी सर्व स्त्री शिक्षिकांचा सत्कार करण्यात आली. अनेक विद्यार्थ्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले. उत्कृष्ट मनोगत व्यक्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना पेन व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. अध्यक्षीय समारोप सौ राजश्री भालेराव यांनी केले. याप्रसंगी योजना बच्चेवार, उषा कंधारे, अरविंद काळे, मंजुषा वानखेडे, फुलावार, मनोहर राठोड, श्रद्धा सावले, अनिता गुंडेवार, मंगेश चाभरेकर, प्रशांत मारलेवाड, पवन रत्नपारखी, दीपिका यादव, माधव लुटे, श्रीराम बोईनवाड यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

टिप्पण्या