नांदेड : (दि.३ जानेवारी २०२६)
यशवंत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने विशेष वार्षिक शिबिरांतर्गत माजी प्र-कुलगुरु प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार महिला व बाल आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या उपक्रमाचे अध्यक्षस्थान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य व भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री. नरेंद्र चव्हाण यांनी भूषविले.
या आरोग्य शिबिरात महिला व बालकांची मोफत आरोग्य तपासणी तसेच मार्गदर्शन करण्यात आले. प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. सोनिया उमरेकर व प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. मारोती यलमगोंडे यांनी उपस्थितांना आरोग्यविषयक सखोल मार्गदर्शन केले तसेच तपासणी देखील केली.
ह्या शिबिरात ६० महिला २५ बालक तसेच ३८ वृद्धांची तपासणी व उपचार झाले
उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यक्रमाधिकारी डॉ. कैलाश इंगोले, डॉ. राजरत्न सोनटक्के, प्रा. अभिनंदन इंगोले व प्रा.आर.जी.भोपाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक, मान्यवरांसह गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. या शिबिरामुळे महिला व बाल आरोग्याविषयी जनजागृती होऊन शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी अशा उपक्रमांचा लाभ सर्व गावकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन केले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ. हरिश्चंद्र पतंगे, प्रसिद्धी समन्वयक डॉ. अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, अभय थेटे, जगन्नाथ महामुने, नाना शिंदे आदींनी सहकार्य केले.

COMMENTS