प्रा. डॉ. विजू जाधव लिखित ‘आंतरराष्ट्रीय व्यवसाय पर्यावरण’ पुस्तकाचे प्रकाशन संपन्न.


नांदेड दि. 

नांदेड एज्युकेशन सोसायटी संचालित पीपल्स कॉलेज, नांदेड येथील वाणिज्य विभागाचे सहाय्यक प्राध्यापक तथा अभ्यासक डॉ. विजू जाधव लिखित एम. कॉम. प्रथम वर्षासाठी उपयुक्त असलेल्या ‘आंतरराष्ट्रीय व्यवसाय पर्यावरण’ या पाठ्यपुस्तकाचे प्रकाशन महाविद्यालयात नुकतेच संपन्न झाले.

या पुस्तकाचे प्रकाशन महाविद्यालयातील प्र. प्राचार्य डॉ. एस. जी. भानेगावकार, उपप्राचार्य डॉ. अशोक सिद्धेवाड, विभाग प्रमुख डॉ. सी. के. हरणावळे, माजी उपप्राचार्य डॉ. बालाजी कोम्पलवार, डॉ. रेश्मा डोईफोडे, वकील वेदांत मयंकर, डॉ. विठ्ठल दहिफळे, डॉ. विशाल पतंगे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय व्यवसाय, जागतिक बँक, बहुराष्ट्रीय कंपन्या, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था, परकीय गुंतवणूक, विदेशी विनिमय व्यवस्थापन कायदा आदी संकल्पना सोप्या व अभ्यासक्रमाभिमुख पद्धतीने समजावून सांगणे हा या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे.

मराठवाड्यातील ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय व्यवसाय हा विषय अधिक सुलभपणे समजावा, या हेतूने डॉ. विजू जाधव यांनी मराठी भाषेत हे पुस्तक लिहिले असून ते विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाशी सुसंगत आहे. पुस्तकाची मांडणी अद्ययावत असून यात मागील 20 वर्षांतील परीक्षेच्या प्रश्नपत्रिकासुद्धा आहेत. पुस्तकात विद्यार्थ्यांच्या परीक्षाभिमुख तयारीचा विशेष विचार करण्यात आला आहे.

उपस्थित मान्यवरांनी डॉ. जाधव यांच्या या शैक्षणिक योगदानाचे कौतुक करून पुस्तक विद्यार्थ्यांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. या पुस्तकाच्या प्रकाशनामुळे पीपल्स कॉलेजच्या शैक्षणिक शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला  गेला आहे.

टिप्पण्या
Popular posts
रविकिरणचे ज्येष्ठ सभासद मनोहर नगरकर आणि रंगकर्मी रघुनाथ कदम स्मृतिगत '३९ व्या रविकिरण बालनाट्य स्पर्धेत' १९ बालनाट्यांतून अटीतटीच्या सामन्यातून 'अडलंय ‘का’ अव्वल!
इमेज
राष्ट्रीय लोकन्यायालयात डॉ. सुरेश सावंत यांचा सत्कार संपन्न
इमेज
दर्शवेळा अमावस्या: ग्रामसंस्कृती आणि शेतीचे प्रतीक
इमेज
चार लेबर कोड विरोधात शेतकऱ्यांप्रमाणे कामगारांनी एकजुटीने लढा देण्याची गरज*
इमेज
वि. स. पागे:रोजगार हमी योजनेचे जनक* भारतातील रोजगार हमी योजनेचे जनक कै. वि. स .पागे यांची २१ जुलै रोजी जयंती आहे. या निमित्ताने त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा हा गौरवास्पद आलेख ..
इमेज