सानपाडा येथील अपना बाजार शाखेचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न*




नवी मुंबई : सानपाडा येथील अपना बाजार या ग्राहकाभिमुख उपक्रमाच्या सानपाडा शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा  १९ डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या  उत्साहात संपन्न झाला. पामबीच जवळील भुमिराज रिट्रीट सोसायटी, मोराज सर्कल जवळील सेक्टर-१४, सानपाडा येथील या नव्या शाखेच्या उद्घाटनास नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. अपना बाजारचे अध्यक्ष अनिल गंगर व उपाध्यक्ष श्रीपाद फाटक यांची विशेष उपस्थिती यावेळी होती.

ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, सानपाडाचे अध्यक्ष मा. श्री. मारुती किसन विश्वासराव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते या नवीन दालनाचं उद्घाटन झालं. मुंबईमध्ये मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गिरणी कामगार विभागात नायगाव येथे १९४८ साली  अपना बाजारची स्थापना झाली. या संस्थेला ७७  वर्ष पूर्ण झाली असून ७८  वर्षात पदार्पण केले आहे.  अपना  बाजार या ग्राहक सहकारी संस्थेच्या २२  शाखा  असून जवळजवळ ४०० कर्मचारी या संस्थेत काम करतात. सध्या  मॉलची संस्कृती असताना देखील  स्पर्धेच्या युगात आपला दर्जेदारपणा व गुणवत्ता टिकून सहकारी तत्वावर चालणारी  *अपना बाजार* ही भारतातील एकमेव सहकारी संस्था असावी.  याप्रसंगी माजी नगरसेवक दशरथ भगत , माजी नगरसेवक सोमनाथ वासकर , राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मंगेश  आमले , भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग आमले,  समाजसेवक भाऊ भापकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख मिलिंद सूर्यराव, नवी मुंबई शिवसेना उपशहर प्रमुख अजय पवार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अजित सावंत, युवासेना उपजिल्हाप्रमुख अविनाश जाधव, समाजसेवक राजू सैद, ज्येष्ठ शिवसैनिक शामराव मोरे, युवा नेते निशांत भगत, व्यवसायिक विकास वाघुळे,   आणि असंख्य सानपाडावासिय उपस्थित होते.

उद्घाटनाच्या वेळी उपस्थित मान्यवरांनी अपना बाजार या संकल्पनेचे कौतुक करत स्थानिक नागरिकांना दर्जेदार व वाजवी दरात वस्तू उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. या शाखेमुळे सानपाडा परिसरातील ग्राहकांना मोठा लाभ होणार असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. अपना बाजारचे संचालक प्रसाद महाडीक यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केलं. उद्घाटन सोहळा आनंददायी व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

टिप्पण्या
Popular posts
दर्शवेळा अमावस्या: ग्रामसंस्कृती आणि शेतीचे प्रतीक
इमेज
वि. स. पागे:रोजगार हमी योजनेचे जनक* भारतातील रोजगार हमी योजनेचे जनक कै. वि. स .पागे यांची २१ जुलै रोजी जयंती आहे. या निमित्ताने त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा हा गौरवास्पद आलेख ..
इमेज
रविकिरणचे ज्येष्ठ सभासद मनोहर नगरकर आणि रंगकर्मी रघुनाथ कदम स्मृतिगत '३९ व्या रविकिरण बालनाट्य स्पर्धेत' १९ बालनाट्यांतून अटीतटीच्या सामन्यातून 'अडलंय ‘का’ अव्वल!
इमेज
राष्ट्रीय लोकन्यायालयात डॉ. सुरेश सावंत यांचा सत्कार संपन्न
इमेज