पूर्वजांचा स्मृतिदिन मानव सेवेने साजरा व्हावा* – प्रतिभा गोरे. मोफत हृदयरोग व नेत्ररोग तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद


 *गंगाखेड प्रतिनिधी —पूर्वजांच्या स्मृतिदिनानिमित्त केवळ धार्मिक विधी न करता समाजोपयोगी,मानवी सेवेतून तो साजरा करणे ही खरी श्रद्धांजली असल्याचे प्रतिपादन जिल्हा पुनर्वसन अधिकारी प्रतिभा गोरे यांनी केले.गरजू रुग्णांची हृदयरोग तपासणी करून आवश्यक असल्यास मोफत एन्जिओप्लास्टी व बायपास शस्त्रक्रिया उपलब्ध करून देणे ही समाजासाठी मोठी आणि प्रेरणादायी सेवा असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वर्गीय भोलारामजी कांकरिया यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिनांक १४ डिसेंबर रोजी गंगाखेड येथील राजेश्वर फंक्शन हॉल येथे बीकेबीसी ट्रस्ट व आनंद ऋषी हॉस्पिटल,अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत हृदयरोग व नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा पुनर्वसन अधिकारी प्रतिभा गोरे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महेश अर्बन बँकेचे चेअरमन घनश्याम मालपाणी होते.प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे, अहिल्यानगर येथील हृदयरोग तज्ञ डॉ. रविराज गवळी,डॉ. रविंद्र येळीकर,डॉ. तुषार नारे, उपजिल्हा रुग्णालय गंगाखेडचे अधीक्षक डॉ. हेमंत मुंडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपाली गीते आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी स्वर्गीय भोलारामजी कांकरिया यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून शिबिरास सुरुवात करण्यात आली.

प्रास्ताविकात ट्रस्टच्या सचिव मंजुषा दर्डा यांनी सांगितले की,मागील अनेक वर्षांपासून ट्रस्टच्या माध्यमातून विविध मानवी सेवाभावी उपक्रम राबवून स्मृतिदिन साजरा केला जातो. “मानवसेवा हीच ईश्वरसेवा” हा संस्कार वडिलांकडून आणि आईकडून मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.आतापर्यंत ट्रस्टतर्फे ३,५०० रुग्णांवर अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून,नारायण ट्रस्टच्या सहकार्याने हजारो दिव्यांगांना साहित्य वाटप करण्यात आले आहे.माणुसकीची भिंत या उपक्रमातून गरजूंना भांडी,कपडे आदींची मदत केली जाते. तसेच भविष्यात “तेरे मेरे सपने” या उपक्रमांतर्गत विवाहपूर्व मार्गदर्शनासाठी गंगाखेड येथे कार्यालय सुरू करण्याचा संकल्प यावेळी जाहीर करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा दर्डा यांनी केले, तर आभार प्रदर्शन मंगल अच्छा यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिद्धार्थ दर्डा, शुभम अच्छा,अमर करंडे,नंदकिशोर सोमानी, आनंद धोका, मनोज नाव्हेकर,रमेश औसेकर , रमेश धोका,महावीर धोका,प्रशांत काबरा, संतोष तापडिया,जावेद खान पठाण आदींनी विशेष परिश्रम घेतले.

 चौकट:- सदरिल शिबरातुन १५० हृदय रुग्णांची तर १७०+ नेत्र तपासणी करण्यात आली.

 अवश्य त्या चिकित्सा करीता आनंदऋषिजी हॉस्पिटल ॲण्ड हार्ट सर्जरी सेंटर अहिल्यानगर येथे करण्यात येणार आहे.

टिप्पण्या
Popular posts
रविकिरणचे ज्येष्ठ सभासद मनोहर नगरकर आणि रंगकर्मी रघुनाथ कदम स्मृतिगत '३९ व्या रविकिरण बालनाट्य स्पर्धेत' १९ बालनाट्यांतून अटीतटीच्या सामन्यातून 'अडलंय ‘का’ अव्वल!
इमेज
राष्ट्रीय लोकन्यायालयात डॉ. सुरेश सावंत यांचा सत्कार संपन्न
इमेज
दर्शवेळा अमावस्या: ग्रामसंस्कृती आणि शेतीचे प्रतीक
इमेज
चार लेबर कोड विरोधात शेतकऱ्यांप्रमाणे कामगारांनी एकजुटीने लढा देण्याची गरज*
इमेज
वि. स. पागे:रोजगार हमी योजनेचे जनक* भारतातील रोजगार हमी योजनेचे जनक कै. वि. स .पागे यांची २१ जुलै रोजी जयंती आहे. या निमित्ताने त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा हा गौरवास्पद आलेख ..
इमेज