नांदेड दि. १३
उत्कृष्ट बालसाहित्यासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांचा जिल्हा न्यायालयात ह्रद्य सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय लोकअदालतीच्या उद्घाटन सत्रात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. श्री. सुनील वेदपाठक यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन डॉ. सावंत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. आशिष गोधमगावकर, जिल्हा सरकारी वकील ॲड. रणजित देशमुख, जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव न्या. शरद देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रीय लोकअदालतीचे महत्त्व सांगून मा. न्या. वेदपाठक यांनी डॉ. सुरेश सावंत यांच्या साहित्यिक कार्यकर्तृत्वाचा गौरव केला.
सत्काराला उत्तर देताना डॉ. सावंत म्हणाले, की साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल माननीय मंत्रीमहोदय, खासदार, आमदार, सनदी अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी माझे सत्कार केले. आज न्यायपालिकेने केलेला सत्कार हा माझ्या साहित्याचा सर्वोच्च सन्मान आहे, अशा शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
या वेळी न्या. शरद देशपांडे यांनी तयार केलेली लोकअदालतीविषयीची चित्रफीत दाखविण्यात आली. लोकअदालतीविषयीची चित्रफीत दाखविण्यात आली. या कार्यक्रमाला न्या. ए. पी. कराड यांच्यासह सर्व न्यायाधीश, वकील आणि न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. गजानन पिंपरखेडे यांनी केले. न्या. शरद देशपांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

addComments
टिप्पणी पोस्ट करा