परभणीची आद्याबाहेती राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत दुहेरी मुकुट*



परभणी (.               ) महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशन वतीने आयोजित 34 वी अंतर जिल्हा  राज्य अजिंक्यपद व 87 वी राज्य मानांकन टेबल टेनिस क्रीडा स्पर्धा पुणे बालेवाडी येथे दि.25 ते 27 ऑक्टोबर 2025 दरम्यान झालेल्या राज्य अजिंक्य टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत परभणी जिल्हा हौशी टेबल टेनिस संघटना खेळाडू  व भारतीय खेल प्राधिकरण यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात यांच्याकडून वतीने खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्राची खेळाडू कु. अद्या बाहेती हिने   महाराष्ट्रात अव्वल येण्याचा मान मिळवला. अद्या बाहेती ने या स्पर्धेत अकरा वर्ष मुलींच्या गटाचे राज्य अजिंक्यपद तसेच पंधरा वर्षे मुलींच्या गटातील राज्य अजिंक्यपद मिळवत दुहेरी मुकुटाची मानकरी ठरली. अकरा वर्ष मुलींच्या गटांमध्ये अद्याबाहेतीने मुंबईच्या स्वरा गुडे या खेळाडू वर 3-0  असा सहज विजय मिळवत राज्य अजिंक्यपद प्राप्त केले. तसेच पंधरा वर्षे मुलीच्या गटात पुण्याच्या नायशा रेवास्कर  हिचा 3-0  असा सहज विजय प्राप्त केले.  या स्पर्धेत आद्या बाहेती प्रमुख आकर्षण ठरली.  तिने पंधरा वर्षे मुलींच्या सांघिक गटाचे नेतृत्व करत परभणी जिल्हास  कांस्यपदक मिळवून दिले.  या संघात तिच्या खेळाडू शरयू टेकाळे, कल्याणी सवंडकर, स्वरनिका पाटील यांचा समावेश होता. या पदकासोबत या स्पर्धेत आद्याने दोन सुवर्ण व  एक कांस्य असे तीन पदक प्राप्त केले.

या उज्वल यशाबद्दल राज्य अध्यक्ष प्रवीण लुकंड , राज्य सरचिटणीस यतिन टिपणीस, राज्य कोषाध्यक्ष संजय कडू जिल्हा संघटनेचे अध्यक्ष समशेर भैया वरपुडकर, कार्याध्यक्ष माधव शेजुळ, जिल्हा सचिव गणेश माळवे , सहसचिव ज्ञानेश्वर पंडित,

जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे , राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंडे क्रीडा अधिकारी सुयश नाटकर रोहन औंढेकर तालुका क्रीडा अधिकारी कल्याण पोले तसेच 

या यशाबद्दल आद्या बाहेती परभणीच्या  यांनी शुभेच्छा देत अभिनंदन केले

टिप्पण्या