नवी मुंबई: कवी हेमंत गोविंद जोगळेकर यांच्या “जीवीचे जिवलग” या पुस्तकाचे प्रकाशन देवाशीष प्रोडक्शनच्या निर्मात्या सुजाता बत्तीन आणि हॅपी हार्ट्स ग्रुप, कामोठेचे अध्यक्ष अरुण मारुती जाधव यांच्या संयुक्त विद्यमाने २५ ऑक्टोबर २०२५ रोजी सरोवर हॉल, कामोठे येथे झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वीट एंजल संस्थेच्या संस्थापिका मंदाकिनी पाटील यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात अवंती अरुण जाधव यांनी सादर केलेल्या देखण्या गणेश वंदनाच्या नृत्याने झाली.
यावेळी ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक आणि लेखक प्रेमानंद गज्वी, इंद्रजित गोंड , अभिनेता व लेखक आर. जे. गोपी रवींद्र भोसले, मराठी पैसाचे संस्थापक महेश चव्हाण , लायन्स क्लबचे सेकंड डिस्ट्रिक्ट गव्हर्नर विजय गणात्रा या मान्यवरांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन करण्यात आले.
पुस्तकातील बा. भ. बोरकर या व्यक्तिचित्राचे अभिवाचन सुजाता बत्तीन यांनी केले. प्रेमानंद गज्वी यांनी " वाचनसंस्कृती जपणे ही काळाची गरज आहे” या विषयावर विचार मांडले.
कार्यक्रमास लेखक नामदेव घोडके, विद्या मोहिते, गीता कुडाळकर, सारिका माळी, मधुरा दंडवते, रमेश यादव, हेमंत लोणकर, करुणा सक्सेना, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे उपस्थित होते. अरुण मारुती जाधव यांनी आभार मानले
आपला
मारुती विश्वासराव

addComments
टिप्पणी पोस्ट करा