शहर वाहतूक शाखेचे हे.कॉ. गजानन राऊत यांचे निधन

नांदेड: वडेपुरी (ता. लोहा) येथील मूळ रहिवासी तथा नांदेड शहर वाहतूक शाखेतील पोलीस अंमलदार गजानन बळीराम राऊत (वय-४५ वर्षे) यांचे हृदयविकाराने २६ जुलै रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्या पार्थिव देहावर शनिवारी २६ जुलै रोजी दुपारी १२ वाजता वडेपुरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, बहिण, पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. वडेपुरी येथील शेतकरी कैलास राऊत यांचे ते भाऊ होत. मितभाषी आणि अत्यंत मनमिळाऊ स्वभाव असलेले पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन राऊत वडेपुरीकर यांच्या अकाली निधनाबद्दल नांदेड पोलीस दलात तसेच नांदेड (द.) परिसरासह वडेपुरी, जानापुरी भागात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

टिप्पण्या