*गंगाखेड (प्रतिनिधी)*
श्रावण महिन्याच्या पावन प्रारंभी दिनांक 25 जुलै रोजी गंगाखेड येथील याज्ञवल्क्य वेद विद्यालय यज्ञभूमी येथे शिवपूजन सोहळ्याची भव्य सुरुवात झाली. आजपासून सुरू झालेल्या या दिव्य उपक्रमाचा प्रारंभ दीक्षित श्रीकृष्ण सेलूकर महाराज समाधी व गोदापात्र दर्शन तसेच श्री गवामयन सत्र सोमयागी रंगनाथ दीक्षित सेलुकर महाराज यांच्या समाधी अभिषेकाने करण्यात आला.
या निमित्त सकाळी १० वाजता भगवानगड कॉर्नर येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रा जायकवाडी वसाहत, आनंद नगर मार्गे यज्ञभूमी येथे विसावली. या शोभायात्रेत याज्ञवल्क्य वेद विद्यालयाचे विद्यार्थी, गुरुजन, शिष्यवृंद, मातृशक्ती, व युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल-ताशा, लेझीम, भगवे पताका आणि भक्तिरसात न्हालेल्या घोषणांनी गंगाखेड नगरी ' हरहर महादेव' च्या जयघोषाने दुमदुमून गेली.
या शिवपूजन सोहळ्यांतर्गत दररोज संध्याकाळी ४:३० ते ७:३० दरम्यान धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यज्ञमार्तंड यज्ञेश्वरजी सेलुकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या सोहळ्यात सर्व हिंदू बांधवांनी उपस्थित राहून धर्मलाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक समितीतर्फे करण्यात आले आहे.
कार्यक्रमात सहभागी होऊन श्रावणमासाच्या पुण्यकार्यात आपला सक्रिय सहभाग नोंदवा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


addComments
टिप्पणी पोस्ट करा