नाट्य आणि सिनेमा क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार राम काजरोळकर

नवी मुंबई : नाट्य,  सिनेमा, मालिका क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार तसेच  सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष राम काजरोळकर  १५ जुलै  २०२५ र...

नवी मुंबई : नाट्य,  सिनेमा, मालिका क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार तसेच  सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष राम काजरोळकर  १५ जुलै  २०२५ रोजी यांचा  ८७ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या सामाजिक कार्याचा घेतलेला आढावा. 

राम काजरोळकर यांचा जन्म १५  जुलै १९३८  रोजी परळ व्हिलेज रोड  येथील म्युनिसिपल चाळीत झाला. शिक्षण  घेण्याच्या काळात त्यांची कौटुंबिक परिस्थिती अतिशय वाईट होती. वयाच्या १५ व्या वर्षीच त्यांच्यावर घराची जबाबदारी आली. त्यामुळे त्यांनी शाळा सुटल्यावर छत्र्यांवर  छत्र्यांवर नाव लिहिण्याचे काम केले. त्याचप्रमाणे फळे व  कागदी पिशव्या विकून त्यांनी ११ वी पर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर नवभारत कपबशीच्या कारखान्यात नोकरी केली.

राम काजरोलकर यांना लहानपणापासूनच नाट्यकला व अभियानाची आवड होती. शिवडी येथील कामगार कल्याण केंद्राच्या नाटकामध्ये त्यांना प्रवेश मिळाला. त्यांनी नाटकात चांगला अभिनय केल्याबद्दल त्यांना या केंद्रातून  अभिनयाचे प्रथम  पारितोषक  मिळाले. परळ व्हिलेज येथील लाल मैदानावर होत असलेल्या  एकांकि नाटकाच्या स्पर्धेत त्यांनी भाग घेतला. पुढे दूरदर्शन वरील कामगार विश्व, आमची माती आमची माणसे, घरकुल या मालिकांमधून काम करत त्यांचा प्रवास सुरू होऊन  नाट्यरंगभूमीपर्यंत ते पोहोचले.

पूर्वीच्या काळात लोकनाट्य फार चालत होती. राम काजरोळकर यांना विनोदी भूमिका देत असत. त्यांचे पहिले नाटक " शंभर नंबरी सोनं,  त्यानंतर " लग्नाला चला" ,   वाटी वस्तारा जिंदाबाद, चार पोपट एक मैना, चांडाळ चौकडी,  गाढवाचं लग्न. हप्त्याचा वायदा, अशी अनेक लोकनाट्य त्यांनी केली. त्यांच्या या सततच्या चांगल्या भूमिकेमुळे २०१० साली अखिल भारतीय नाट्य परिषद मुंबई या संस्थेच्या वतीने दादू इंदुरीकर पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.

पुढे त्यांची नाटकाकडे वाटचाल सुरू झाली. प्रतिकार, शांतेच कार्ट चालू आहे, आमचं सगळं सात मजली, बुवा तेथे बाया, शोलेला लागले कोल्हे, सारेच सज्जन. आधी लग्न सोंगाड्याच, एकदा तरी हो म्हण, वात्रट मेले अशा अनेक नाटकातून स्वतःची नोकरी सांभाळून त्यांनी काम केलं. मधल्या काळात राम काजरोळकर यांना रेल्वेची नोकरी लागली. रेल्वेच्या सांस्कृतिक विभागात त्यांचे पदार्पण झाले. अगर यही रफ्तार रही तो, बडी देर की मेहरबा आते आते, भूक काश्मीर को बंगाल बना देती है, अशा कादरखान लिखित प्रत्येक एकांकी स्पर्धेत त्यांना अभिनयाचे  प्रथम पारितोषक  मिळाले. तसेच मायनस फिफ्टी, राधा ना बावरी, वाघ येणार आहे,  पूर्णविराम, भूमिका, भारत एक खोज, कीसी सीमा की मामूलसी घटना अशा अनेक एकांकिका त्यांनी सादर केल्या. 

राम काजरोळकर यांच्या नाटक व लोकनाट्यातील भूमिका बघून चित्रपट दिग्दर्शक पितांबर काळे यांनी ", उतावळा नवरा"  या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सासर्‍यांची भूमिका  देऊन त्यांचे चित्रपटात पदार्पण झाले. त्यानंतर गौराचा नवरा, सौभाग्यवती सरपंच, गंध मातीला आला, हिरवा चुडा सुहासिनीचा तर वयाच्या ६०  वर्षानंतर कवडसे, साई दर्शन, उमंग, सासू नंबरी _ जावई दस नंबरी, भक्ती तिथे शक्ती, मोहन आवटे, श्रीमंत दामोदर पंत अशा अनेक चित्रपटातून दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याची त्यांना संधी मिळाली. तसेच भूमिपुत्र हा भोजपुरी चित्रपट आणि बेहेनेर माया, या बंजारी भाषेतील चित्रपटात काम करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली.

दरम्यान टीव्ही चॅनल सुरू झाले.  राम काजरोळकर यांचा मालिकेत प्रवेश झाला. दामिना, अवघाची संसार,  चाळ कुरू कुरू, कुलवधू,  रुणझुण, या मालिकेत त्यांना प्रवेश मिळाला. भाग्यलक्ष्मी,  मधु येथे चंद्र तिथे, आतला आवाज,  गंगाधर टिपरे अशा अनेक मालिकांमध्ये ते कार्यरत राहिले. वयाच्या ७५  वर्षात देखील मध्यम वर्गीय व प्रेम कहानी या चित्रपटात त्यांनी काम केले.

राम काजरोळकर यांना लहानपणी शिक्षण घेताना जो त्रास झाला त्याची जाणीव ठेवून त्यांनी चाळीतील विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तकांचे वाटप स्वखर्चाने केले. राहत असलेल्या चाळीत  जागा नसल्यामुळे मित्रांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य  क्लासेस घेऊन उघड्या जागेवर  वर्ग   चालविले. रेल्वेत नोकरी करीत असताना कुर्ला  शाखेतील नॅशनल रेल्वे मजदुर  युनियनचे ते तीन वर्ष पदाधिकारी होते. या कालावधीत अनेक कामगारांच्या तक्रारी सोडवण्याचे त्यांनी काम केले. कुर्ला येथील मध्य रेल्वे इन्स्टिट्यूटचे ते ६ वर्षे सांस्कृतिक सचिव होते. या काळात त्यांनी इन्स्टिट्यूटला बरीच बक्षिसे मिळवून दिली. 

कॅरम, टेबल टेनिस, बिलीअर्ड, स्नूकर या खेळाची त्यांना आवड होती. या खेळामध्ये त्यांना बक्षीस देखील मिळाली. सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे  पाच वर्षे सचिव म्हणून त्यांनी काम केले.  आदिवासी लोकांना मदत करणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी मेडिकल कॅम्प घेणे, 

गरजूंना पोलीस स्टेशन किंवा हॉस्पिटल सारख्या सेवेत मदत करणे अशी अनेक प्रकारचे सामाजिक कार्य त्यांनी आत्तापर्यंत केली आहेत. आताही ते ८७  व्या वयात त्यांना जे जे शक्य असेल,  त्याप्रमाणे समाजातील गरजूंना  मदत करीत असतात. राम काजरोळकर यांना उदंड आयुष्य आणि चांगले आरोग्य लाभो हीच सदिच्छा.

आपला 

मारुती विश्वासराव 

मोबाईल नंबर ९८६९०२०८५८

COMMENTS

[विशेष न्युज]

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel