*गंगाखेड ( प्रतिनिधी)*
चाणक्य अबॅकस अकॅडमी आयोजित नॅशनल लेवल अबॅकस स्पर्धा दिनांक 05 जुलै रोजी संपन्न झाली, यात गंगाखेड येथील तानाजी चंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत वेगवेगळ्या ग्रुप मध्ये जे विद्यार्थी सहभागी झाले होते त्यात ग्रुप-A मधून सुमित तांदळे, ग्रुप -B मधून आरोह चंदे, ग्रुप -Z मधून वेदांत तांदळे, ग्रुप -C मधून रेहान शेख हे विद्यार्थी प्रथम क्रमांकावर व ग्रुप -A मधून श्री कांबळे व ग्रुप -C मधून प्रगती गांगर्डे हे द्वितीय क्रमांकावर व ग्रुप - Z मधून प्रणव मोरे याने तृतीय क्रमांक मिळवला तसेच ग्रुप -A मधून स्वराज कदम याने पाचवा क्रमांक मिळवला.. तसेच या स्पर्धेत ग्रुप B मधून आर्यन आळणे याने 6 वा क्रमांक मिळवला.. या स्पर्धेत सहभागी असलेले गंगाखेड येथील क्लास चे सर्वच्या सर्व विद्यार्थी बक्षीसास पात्र झाले असून या सर्व विद्यार्थ्यांना तानाजी चंदे यांनी मार्गदर्शन केले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा