देगलूर:- तालुक्यातील हानेगाव येथे दुचाकीवर नातेवाईकाला भेटण्यासाठी आलेल्या एका 24 वर्ष युवकाने उभ्या असलेल्या बसला धडक दिल्याने. यात सदर युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दिनांक 27 जून रोजी साडेनऊ वा. च्या दरम्यान घडली आहे.
सदरील शिवहर मनोहर हत्ते रा. देवणी ता. निलंगा जि.लातूर असे मयत युवकाचे नाव आहे. तो शुक्रवारी नातेवाईकाकडे जात असताना हाणेगाव येथील बसस्थानक परिसरातील मार्केट यार्ड कमानीजवळ मुक्कामी असलेल्या उदगीर येथील आगाराची एसटी बस उभा असलेल्या क्रमांक एम एच 14 बी. पी. 3891 पाठीमागून जोराची धडक दिल्याने. त्यात झालेल्या अपघात अति रक्तस्त्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ग्रामस्थांनी सदर युवकास हानेगावच्या प्राथमिक रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचार दरम्यान डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. घटनेचा अधिक तपास मरखेल पोलिस हे करत आहेत.
addComments
टिप्पणी पोस्ट करा