नांदेड दि. २९
भारतीय राष्ट्रीय साहित्य अकादमीकडून बालसाहित्यातील योगदानासाठी नांदेड येथील ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुरेश सावंत यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार भारताच्या साहित्य क्षेत्रातील एक सर्वोच्च पुरस्कार आहे. भारतीय भाषांमधील उत्कृष्ट साहित्यकृतीसाठी हा पुरस्कार दिला जातो. डॉ. सुरेश सावंत यांना हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे नांदेडचे आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी डॉ. सुरेश सावंत यांच्या निवासस्थानी जाऊन डॉ. यांचा सपत्नीक सन्मान केला.
डॉ. सुरेश सावंत यांच्या शैक्षणिक व साहित्यिक कार्यामुळे आणि त्यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे नांदेडच्या वैभवात भर पडली आहे, असे नांदेड उत्तरचे लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी काढले. डॉ. सुरेश सावंत यांचा सन्मान करताना आ. कल्याणकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
२०२५ या वर्षीच्या मराठी भाषा साहित्य अकादमीच्या पुरस्काराने नांदेडला सन्मानित केले आहे. डॉ. सुरेश सावंत यांच्या “आभाळमाया” या साहित्यकृतीला भारतीय साहित्य अकादमीने एकमताने सन्मानित केले आहे.
डॉ. सुरेश सावंत यांना मिळालेल्या या मराठी साहित्यातील सर्वोच्च बहुमानामुळे नांदेडच्या वैभवात भर पडली आहे. डॉ. सुरेश सावंत हे एक तपस्वी व्यक्तिमत्त्व असून त्यांनी आजवर शैक्षणिक व साहित्य क्षेत्रात अनमोल असे योगदान दिलेले आहे, याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे, अशा शब्दांत आ. कल्याणकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
डॉ. सुरेश सावंत कर्मभूमी नांदेड असून त्यांचे निवासस्थान माझ्या नांदेड उत्तर मतदारसंघात असल्याचा मला अभिमान वाटतो, असे आ. बालाजीराव कल्याणकर म्हणाले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गंगाधर बडुरे, महिला जिल्हाप्रमुख सौ. अपर्णाताई ऋषीकेश नेरलकर, श्याम पाटील कोकाटे, शहरप्रमुख उमेश दिघे, मुन्ना राठौर, गणेशअप्पा हलकोंडे इ. पदाधिकारी उपस्थित होते.
addComments
टिप्पणी पोस्ट करा