मुंबई बंदराला पुन्हा चांगले दिवस येतील _ दत्ता खेसे

मुंबई:  मुंबई पोर्ट ट्रस्टची स्थापना  २६  जून  १८७३ साली झाली. ससून डॉक,प्रिन्सेस डॉक, व्हिक्टोरिया डॉक,अलेक्झँड्रा डॉक म्हणजेच आत्ताचे इंदि...


मुंबई:  मुंबई पोर्ट ट्रस्टची स्थापना  २६  जून  १८७३ साली झाली. ससून डॉक,प्रिन्सेस डॉक, व्हिक्टोरिया डॉक,अलेक्झँड्रा डॉक म्हणजेच आत्ताचे इंदिरा डॉक   ते वडाळ्यापर्यंत गोदीचा  दोन हजार एकर पर्यंत पसरलेला  परिसर आहे. अनेक वर्ष भारतातील प्रमुख बंदरांमध्ये  मुंबई बंदर प्रथम क्रमांकावर होते. सध्या मुंबई पोर्ट हे लँडलॉर्ड पोर्ट प्रमाणे काम करीत आहे. काही वर्षांपूर्वी मुंबई बंदराची  आर्थिक स्थिती खालावली होती.  परंतु आता मुंबई  बंदराचा आर्थिक  आलेख उंचावत चालला आहे. त्यामुळे मुंबई बंदराला  पुन्हा चांगले  दिवस येतील.  असे स्पष्ट उद्गार मुंबई पोर्ट  प्राधिकरणाचे माजी बोर्ड मेंबर व मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी दत्ता खेसे यांनी मुंबई पोर्टच्या १५२  व्या वर्धापन दिनानिमित्त इंदिरा गोदीत एका जाहीर सभेत काढले.

मुंबई पोर्ट प्राधिकरणाला २६ जून २०२५  रोजी १५२ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल  मुंबई पोर्टच्या प्रत्येक विभागाने वर्धापन दिन साजरा करावा,  असे आदेश मुंबई पोर्ट प्रशासनाने काढले होते. 

त्यानुसार इंदिरा गोदीत  गोदी विभागातर्फे  हमालेज बिल्डिंगच्या कार्यालयात वरिष्ठ गोदी प्रबंधक अजित झरकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई पोर्ट  प्राधिकरणाचा १५२  वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. युनियनचे सेक्रेटरी दत्ता खेसे यांनी सर्वप्रथम वर्धापन दिनाच्या गोदी कामगार व अधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की,  मी बोर्ड मेंबर असताना मुंबई पोर्टच्या पेन्शन फंडात पाच हजार कोटींची आर्थिक तूट होती,  ती एक वर्षांपूर्वी ३०० कोटीवर आली होती. मात्र आता पुन्हा ही आर्थिक तुट एक हजार कोटीपर्यंत वाढली आहे. मुंबई पोर्ट मधून २०२२ - २३ यावर्षी ६३.६२ दशलक्ष टन, २०२३-२४  यावर्षी ६७.२६  दशलक्ष टन तर २०२४-२५  या वर्षात ६८.६२  दशलक्ष टन मालाची चढ-उतार झाली.  ही कमी कामगारांमध्ये केलेल्या कामाची  ऐतिहासिक नोंद आहे. मुंबई पोर्टचा आर्थिक आलेख उंचावत चाललेला आहे.  मुंबई पोर्टच्या अनेक जागा लीजवर जात असून, त्यामाध्यमातून मुंबई पोर्टला चांगले उत्पन्न मिळते, त्यामुळे लवकरच रिझर्व फंडातील आर्थिक तूट भरून निघेल. शेवटी खेसे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, गोदी कामगारांना वेतनकराराची  एकरकमी थकबाकी देखील लवकरच मिळेल.

पोर्ट ट्रस्ट  कामगार अंकाचे  कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात सांगितले की, सर्वप्रथम कामगारांना व अधिकाऱ्यांना मुंबई पोर्टच्या १५२  व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मुंबई पोर्टमध्ये पूर्वी ४२ हजार कामगार होते, आज २६००  कामगार शिल्लक राहिले आहेत. तर ३६  हजार पेन्शनर्स आहेत.  ज्येष्ठ गोदी कामगार नेते डॉ.  शांती पटेल आणि कॉ. एस. आर. कुलकर्णी यांनी  गोदी कामगारांना चांगली पगारवाढ,  पेन्शन, वैद्यकीय सुविधा अशा अनेक कामगार कल्याणकारी योजना मिळून दिल्या आहेत. त्यामध्ये गोदी कामगार आनंदीत आहेत.  ही धुरा ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांच्या नेतृत्वाखाली यापुढे चालू आहे. मुंबई पोर्टला शंभर वर्ष पूर्ण झाली तेव्हा कामगार नेत्यांनी कामगारांसाठी "शताब्दी स्मारक निधी" फंड निर्माण केला आहे. या निधीतून गोदी कामगारांना चष्म्याचे पैसे व शैक्षणिक कर्ज मिळते. मुंबई पोर्टला १२५  वर्ष पूर्ण झाली तेव्हा  टायटनचे घड्याळ गोदी  कामगारांना मिळाले होते.  मुंबई पोर्टला  दीडशे वर्षे झाली. म्हणून गोदी कामगारांना आकर्षक भेटवस्तू देण्याची मागणी कामगार संघटनेने केली होती. मात्र ही मागणी मुंबई पोर्ट प्रशासनाने अद्याप पूर्ण केली नाही. मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष मिलिंद घनकुटकर यांनी वर्धापन दिनानिमित्त गोदी कामगारांना शुभेच्छा देऊन, आपल्या भाषणात सांगितले की. गोदी कामगारांना कामगार नेत्यांनी भरपूर काही मिळून दिले आहे. हॉस्पिटल सारखी चांगली सुविधा आहे. आज कामगारांची भरती होत नसून,  कमी कामगारांमध्ये कामगार काम करीत आहेत. कोरोना काळात देखील गोदी कामगारांनी व अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं. 

याप्रसंगी मु. पो. प्रा. स्थानीय लोकाधिकार समितीचे सेवानिवृत्त पदाधिकारी संजय माधव, वरिष्ठ गोदी प्रबंधक अजित झरकर यांनी कामगारांना वर्धापन दिनानिमित्ताने शुभेच्छा दिल्या. सभेचे सूत्रसंचालन शशिकांत गवळी यांनी केले.    वर्धापन दिनानिमित्ताने सेवानिवृत्त कामगार दत्ता खेसे. संजय माधव, दशरथ करलकर, संतोष सकपाळ, निसार युनुस.  सुशील प्रधान यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. अशाच प्रकारचे वर्धापन दिनाचे कार्यक्रम मुख्य यांत्रिक अभियंता,  लेखा विभाग,  यांत्रिक अभियंता, कल्याण विभाग, प्रशासकीय विभाग. कायदा विभाग,  वैद्यकीय विभागातर्फे साजरे करण्यात आले. वडाळा येथे वैद्यकीय विभागात झालेल्या कार्यक्रमांमध्ये सेवानिवृत्त कर्मचारी आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट  डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज यांचा वर्धापन दिनानिमित्ताने शाल,  श्रीफळ  आणि पुष्पगुच्छ देऊन  सत्कार करण्यात आला. 

आपला 

मारुती विश्वासराव

COMMENTS

[विशेष न्युज]

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel