मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रम समितीवर धनंजय तांबेकर -पतसंस्था व्यवस्थापन पदविकेचा अभ्यासक्रम करणार तयार

नाशिक, दि.23: गोदावरी अर्बन मल्टिस्टेटचे व्यवस्थापकीय संचालक, राज्य पतसंस्था फेडरेशनचे संचालक, तसेच सहकार क्षेत्रातील प्रख्यात तज्ज्ञ धनंजय तांबेकर यांची नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ’पतसंस्था व्यवस्थापन पदविका’ अभ्यासक्रम समितीवर निवड झाली आहे. एक विषयतज्ज्ञ म्हणून त्यांच्या अनुभवाचा फायदा आता राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांना होणार आहे.

धनंजय तांबेकर हे सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून सुपरिचीत आहेत. त्यांनी ज्या ज्या संस्थांमध्ये कार्य केले त्या संस्था नावारूपास आल्या आहेत. सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून त्यांनी देशविदेशातील अनेक सेमीनारमध्ये मार्गदर्शन केले आहे. नाशिक येथील

मुक्त विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतर्फे ’डिप्लोमा इन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी मॅनेजमेंट’हा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. याच अभ्यासक्रमाचा विषयनिहाय अभ्यासक्रम (ीूश्रश्ररर्लीी) तयार करण्यासाठी एका तज्ज्ञ सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये ’सहकारी पतसंस्थांचे व्यवस्थापन’ या विषयासाठी धनंजय तांबेकर यांची विषयतज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली. या विषयाच्या समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. रवींद्र भोसले काम पाहणार आहेत. सहकार क्षेत्रातील तांबेकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान आणि ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांना व्हावा, या उद्देशाने ही निवड केल्याचे विद्यापीठाने पत्रात नमूद केले आहे. यासंदर्भातील बैठक 27 मे रोजी विद्यापीठाच्या मुख्यालयात नाशिक येथे पार पडली.

टिप्पण्या